काटे जरी गुलाबा, तो वाटतो सुगंधा
दुःखास मीच माझ्या झाकून पाहते मी
दुःखास मीच माझ्या झाकून पाहते मी
भांबावल्या क्षणांनी हरपून भान गेले
माझे मलाच येथे शोधून पाहते मी
माझे मलाच येथे शोधून पाहते मी
येथील माणसांची जाणीव होत गेली
वागायचे कसे मी ठरवून पाहते मी
वागायचे कसे मी ठरवून पाहते मी
जग बोलते असे का जग भांडते असे का?
माझ्यातल्या उणीवा सांडून पाहते मी
माझ्यातल्या उणीवा सांडून पाहते मी
सांगायचे मलाही बोलायचे मलाही
सखयास गूज मनिचे सांगून पाहते मी
सखयास गूज मनिचे सांगून पाहते मी
आहे भविष्य माझे घडवायचे मला मग
माझ्या भविष्यकाळा घडवून पाहते मी
माझ्या भविष्यकाळा घडवून पाहते मी
२.
भोगायचे मला ना सोसायचे मलाही
हे डाव संचिताचे खोडायचे मलाही
भोगायचे मला ना सोसायचे मलाही
हे डाव संचिताचे खोडायचे मलाही
ग्रीष्मातल्या उन्हाची झळ दाटली किती ही
या सावली उन्हाशी खेळायचे मलाही
या सावली उन्हाशी खेळायचे मलाही
वारा उनाड वाहे येथे जरी सुखाने
मोडून वाट त्याची धावायचे मलाही
मोडून वाट त्याची धावायचे मलाही
येता चहू दिशेने तूफान संकटाचे
येथील वादळांशी झुंजायचे मलाही
येथील वादळांशी झुंजायचे मलाही
काळोखल्या नभाची घेऊन भेट आता
आकाश तारकांचे वेचायचे मलाही
थोड्या पराभवाने आता नको निराशा
विश्वास ठाम आहे जिंकायचे मलाही
विश्वास ठाम आहे जिंकायचे मलाही
धैर्यास जागवूनी गाठायचे यशाला
जे पाहिजे असे ते मिळवायचे मलाही
जे पाहिजे असे ते मिळवायचे मलाही
फुलपाखरा परी मी मदमस्त बागडूनी
आनंद जीवनाचे वाटायचे मलाही
आनंद जीवनाचे वाटायचे मलाही
उधळून मी सुगंधा द्यावे दहा दिशांना
होऊन फूल येथे बहरायचे मलाही
होऊन फूल येथे बहरायचे मलाही
No comments:
Post a Comment