तुझ्या स्मृतींचा मनात वावर...भेटू आपण
इतिहासाला करून साक्षर ...भेटू आपण
तुला हव्या त्या संकेतावर...भेटू आपण
गतकाळाच्या स्मृतीपटलावर...भेटू आपण
गतकाळाच्या स्मृतीपटलावर...भेटू आपण
मार्ग वेगळे झाले असले दोघांचेही
पहिल्या वहिल्या त्या रस्त्यावर ...भेटू आपण
पहिल्या वहिल्या त्या रस्त्यावर ...भेटू आपण
वर्तमानही घडवत नाही भेट आपली
भविष्य म्हणते दावित गाजर...भेटू आपण
भविष्य म्हणते दावित गाजर...भेटू आपण
अहंपणाच्या किनाऱ्यावरी सोडू घोडे
तडजोडीच्या नव्या पुलावर...भेटू आपण
तडजोडीच्या नव्या पुलावर...भेटू आपण
आठवणींच्या रहदारीचा महामार्ग हा
करेल आपुला प्रवास सुखकर...भेटू आपण
करेल आपुला प्रवास सुखकर...भेटू आपण
२.
थोडी खात्री,थोडा संभव
हे जगण्याचे आहे वास्तव
हे जगण्याचे आहे वास्तव
शर्यत सांगे एकच वास्तव
सशास मागे टाके कासव
सशास मागे टाके कासव
गावे गाणे की रडगाणे
या प्रश्नाचे उत्तर पाठव
या प्रश्नाचे उत्तर पाठव
तुझ्याप्रमाणे शब्दानाही
असती वळणे,असते सौष्ठव
असती वळणे,असते सौष्ठव
नाव गोंदले अधरांवरती
इतिहासाच्या नोंदी आठव
इतिहासाच्या नोंदी आठव
देव राहतो कुठल्या देशी?
इथे राहती मानव- दानव
इथे राहती मानव- दानव
कायद्यातल्या पळवाटांंनी
कायद्यासही केले गाढव
कायद्यासही केले गाढव
- प्रसाद कुलकर्णी
No comments:
Post a Comment