आकाशाला लाख दिव्यांचे गाव म्हणालो
एक दिवा पण तुझ्या अंतरी लाव म्हणालो
सावल्यांस गोंजारत बसणे पुष्कळ झाले
पूर्णच दे या अंधाराला वाव म्हणालो
पूर्णच दे या अंधाराला वाव म्हणालो
जगलो मी पण हाव न केली जगण्याचीही
मृत्यूलाही खेळ तुझा तू डाव म्हणालो
मृत्यूलाही खेळ तुझा तू डाव म्हणालो
सारे काही संपवून ती हसली थोडी
नकोस आणू माणुसकीचा आव म्हणालो
नकोस आणू माणुसकीचा आव म्हणालो
नजरेमधली असुया ठेऊन गेले कासव
सशास उठवुन "अरे, पुन्हा तू धाव" म्हणालो
सशास उठवुन "अरे, पुन्हा तू धाव" म्हणालो
माझ्या पाऊल खुणांस हुडकत नियती येते
रस्त्यांचा माझ्या मी घेइन ठाव म्हणालो
रस्त्यांचा माझ्या मी घेइन ठाव म्हणालो
दुर्दैवाने हाक दिली की कुणी न वाली
तुझ्यापुढे तू लाव 'विजय' हे नाव म्हणालो
तुझ्यापुढे तू लाव 'विजय' हे नाव म्हणालो
२.
कुठे हेटाळल्या जखमा
उराशी ठेवल्या जखमा
उराशी ठेवल्या जखमा
कुणाचे बोल होते ते
जिव्हारी जाहल्या जखमा
जिव्हारी जाहल्या जखमा
जरा आश्वस्त झालो मी
तिने कुरवाळल्या जखमा
तिने कुरवाळल्या जखमा
जुनी ओळख निघाली अन
बऱ्याही वागल्या जखमा
बऱ्याही वागल्या जखमा
नव्यांची कौतुके भारी
जुन्या रागावल्या जखमा
जुन्या रागावल्या जखमा
सुखाची लागता चाहुल
पुढे सरसावल्या जखमा
पुढे सरसावल्या जखमा
तिचा तो मोगरा फुलला
इथे गंधाळल्या जखमा
इथे गंधाळल्या जखमा
३.
तुझ्यावाचुनी करमत नाही
फक्त कुठे मी मिरवत नाही
फक्त कुठे मी मिरवत नाही
सर्व खरोखर कळते ज्याला
उगाच काही बरळत नाही
उगाच काही बरळत नाही
उंचावरूनी पडणाऱ्याला
कुणीच का हो रोखत नाही ?
कुणीच का हो रोखत नाही ?
उभारले असते घर मीही
पत्ता कुणी विचारत नाही
पत्ता कुणी विचारत नाही
अशीच येते तुझी आठवण
हल्ली तीही झोपत नाही
हल्ली तीही झोपत नाही
जगा वाटते उदास आहे
म्हणून मीही हासत नाही
म्हणून मीही हासत नाही
मला आडवा येणारा तो
रांगत जातो, चालत नाही
रांगत जातो, चालत नाही
फोटो मधली आई आता
ऐकत असते, बोलत नाही
ऐकत असते, बोलत नाही
४.
नदी, वीज, अत्तर, फुलाशी करू
तुझी सांग तुलना कुणाशी करू
तुझी सांग तुलना कुणाशी करू
तुला भेटुनी थेट बोलेन मी
कशाला तयारी मनाशी करू
कशाला तयारी मनाशी करू
जरा तारकांची घडी विस्कटो
अशी छेडखानी नभाशी करू
अशी छेडखानी नभाशी करू
तुझा गंध उरतोच श्वासातुनी
बहाणे किती मी जगाशी करू
बहाणे किती मी जगाशी करू
तुझ्या दारची खूण जोपासण्या
उभा देह प्राजक्त राशी करू
उभा देह प्राजक्त राशी करू
प्रवासात काटेच आहेत जर
शहाऱ्यांत वस्ती जराशी करू
शहाऱ्यांत वस्ती जराशी करू
जिथे हाक येते तिथे थांबतो
किती चालणे मी उपाशी करू
किती चालणे मी उपाशी करू
पुन्हा सांज दारात व्हावी तुझ्या
किती आर्जवे या उन्हाशी करू
किती आर्जवे या उन्हाशी करू
५.
अर्थ होता ज्ञात तेव्हा गात होती अक्षरे
लुप्त मौनाच्याच गाभाऱ्यात होती अक्षरे
लुप्त मौनाच्याच गाभाऱ्यात होती अक्षरे
गंध, वाणी, मौन सारे व्यक्त होणे थांबले
हात हाती त्या तिच्या स्पर्शात होती अक्षरे
हात हाती त्या तिच्या स्पर्शात होती अक्षरे
मी उगा चिंतेत होतो काय नियती मांडते
मांडण्या माझी व्यथा निष्णात होती अक्षरे
मांडण्या माझी व्यथा निष्णात होती अक्षरे
आठवांनी पापण्या अलगद तिच्या पाणावल्या
पण तिच्या ओठांवरी तैनात होती अक्षरे
पण तिच्या ओठांवरी तैनात होती अक्षरे
सांजवारा धूर्त होता, वाटही होती फितुर
अन पुढे अंधूकशा वळणात होती अक्षरे
अन पुढे अंधूकशा वळणात होती अक्षरे
शेवटी हुंकार अन ओंकार ओठी राहिले
हुंदक्याच्या जाणत्या गर्भात होती अक्षरे
हुंदक्याच्या जाणत्या गर्भात होती अक्षरे
- विजय उतेकर,
कुर्ला ( मुंबई )
९८९२६४४८३९
No comments:
Post a Comment