१.
कोरलेली तन्मनावर जात मिटली जात आहे
माणसांचा भेद सांगा कोणत्या धर्मात आहे
माणसांचा भेद सांगा कोणत्या धर्मात आहे
जन्मदात्री या जगाची हाय अबला का ठरावी
ज्या सबळतेला तयांच्या त्याच स्त्रीचा हात आहे
ज्या सबळतेला तयांच्या त्याच स्त्रीचा हात आहे
त्या धरेची कूस सारी आज येथे वांझ व्हावी
खत,रसायन विष ठरते दोष ना गर्भात आहे
खत,रसायन विष ठरते दोष ना गर्भात आहे
इंद्रियांनी ज्ञान घ्यावे शिक्षणाचे दार व्हावे
बालकांची पाठशाळा ना खरी वर्गात आहे
बालकांची पाठशाळा ना खरी वर्गात आहे
शब्द होते तोकडे अन् स्पर्श व्हावा रेशमाचा
मूक जी वात्सल्य भाषा कोणत्या कोषात आहे
मूक जी वात्सल्य भाषा कोणत्या कोषात आहे
२.
कधी चांदणे कधी निखारे आयुष्याच्या वाटेवरती
कधी गारवा वादळवारे आयुष्याच्या वाटेवरती
कधी गारवा वादळवारे आयुष्याच्या वाटेवरती
मनात स्वप्ने हजार होती जरी छाटल्या उमेद शाखा
जिद्द उराशी फुटे धुमारे आयुष्याच्या वाटेवरती
जिद्द उराशी फुटे धुमारे आयुष्याच्या वाटेवरती
प्रकाश कुबड्या नको कुणाच्या धरा ,चंद्रमा नकोच होणे
स्वयंप्रकाशी होऊ तारे आयुष्याच्या वाटेवरती
स्वयंप्रकाशी होऊ तारे आयुष्याच्या वाटेवरती
किती मुखवटे लावित जावे मंचावरती दुःख गिळावे
सुहास्य वदने अभिनय सारे आयुष्याच्या वाटेवरती
सुहास्य वदने अभिनय सारे आयुष्याच्या वाटेवरती
खळखळतांना वहात जावे मुक्त झ-यासम कडेकपारी
अता वाटते नको किनारे आयुष्याच्या वाटेवरती
३.
गुन्हा काय माझा कळावा अबोला
अकारण दुरावा छळावा अबोला
अकारण दुरावा छळावा अबोला
जिवाने धुरातच किती गुदमरावे
सुगंधी कधी दरवळावा अबोला
सुगंधी कधी दरवळावा अबोला
असे फायद्याची खरी एक संधी
पुन्हा प्रेम खुलता फळावा अबोला
पुन्हा प्रेम खुलता फळावा अबोला
कधी मी पणाचे कुठे काय झाले
जरा नम्र होता गळावा अबोला
जरा नम्र होता गळावा अबोला
नको उग्र इतका विसंवाद व्हावा
तडे जात असता टळावा अबोला
- आरती पद्मावार
तडे जात असता टळावा अबोला
- आरती पद्मावार
No comments:
Post a Comment