वसंत केशव पाटील : एक गझल


छापून लेख आला चर्चा बरीच झाली
लोकांस ते कळाले हेल्यास गाय व्याली
.
लुंगी धरून कोणी गेली पळून चिंगी
गावात मात्र मागे रक्तात रात न्हाली
.
रस्ता असा कसा हा वाटेवरी गळाला
गोत्यात पाय फसुनी गुडघ्यात मान आली
.
नाही सुरात काही गेली पुरात गावे
पाणी तहानलेले त्या मोकळ्या पखाली
.
हा रोजचा तमाशा पेंद्या प्रधान झाला
त्याचीच ती तुतारी लोकांस कोण वाली ?
.
ओसाड गाव झाले दुष्काळ 'काळ ' आला
आता घरात येथे साऱ्या घुशी नि पाली
.
होते लपून सोदे बोळात बोलणारे
काळोख दाटला हा शोधू चला मशाली

No comments: