१.
मघा मी वाचले होते तुझे डोळे
मघाशी बोलके होते तुझे डोळे
मघा मी वाचले होते तुझे डोळे
मघाशी बोलके होते तुझे डोळे
तुझ्या सौंदर्यस्वप्नांची मला गोडी
मला हे बोलले होते तुझे डोळे
मला हे बोलले होते तुझे डोळे
भुलूनी कालची दुःखे उद्यासाठी
रवाना जाहले होते तुझे डोळे
रवाना जाहले होते तुझे डोळे
धडे मी गिरविले अन् पेरली क्रांती
यशाची पायरी होते तुझे डोळे
यशाची पायरी होते तुझे डोळे
तुला शोधावयाला त्रास ना व्हावा
मनावर कोरले होते तुझे डोळे
मनावर कोरले होते तुझे डोळे
निखारे पोस अपुल्या काळजामध्ये
युगंधर जाळले होते तुझे डोळे
युगंधर जाळले होते तुझे डोळे
२.
पायवाटेमधे लागले हे शहर
गाव माझे मला वाटले हे शहर
पायवाटेमधे लागले हे शहर
गाव माझे मला वाटले हे शहर
ना इथे पाहणी ना इथे राखणी
वादळांनी पुरे घेरले हे शहर
वादळांनी पुरे घेरले हे शहर
बाग फुलवायला घेतली मी इथे
या विजांनी पुन्हा जाळले हे शहर
या विजांनी पुन्हा जाळले हे शहर
बोलवूया नको चंद्रमाला इथे
लाल रंगामधे रंगले हे शहर
लाल रंगामधे रंगले हे शहर
चल युगंधर पुढे वाट चालायची
वेदनेसारखे भावले हे शहर
वेदनेसारखे भावले हे शहर
- प्रमोद वाळके ' युगंधर '
No comments:
Post a Comment