१.
पुन्हा पाहिल्या व्यर्थ मारून हाका
किती दूर जाणार जाऊन हाका ?
किती दूर जाणार जाऊन हाका ?
तहानेस माझ्या अता अंत नाही
अता प्यायच्या फ़क्त घोळून हाका !
अता प्यायच्या फ़क्त घोळून हाका !
अकारण कशाला तुझा माग काढू ?
दिल्या तूच होत्यास मागून हाका !
दिल्या तूच होत्यास मागून हाका !
कुणी हात सोडून जातो कुणाचा
कुणी मारतो हात जोडून हाका !
कुणी मारतो हात जोडून हाका !
नको हात लावूस कोळीष्टकांना
पुन्हा लख्ख होतील झाडून हाका !
पुन्हा लख्ख होतील झाडून हाका !
नव्याने तरी काय सुचणार आता ?
हवे तर लिहा शब्द खोडून हाका !
हवे तर लिहा शब्द खोडून हाका !
अता चक्क जातात लांबून माझ्या
कधी द्यायचे लोक थांबून हाका !
कधी द्यायचे लोक थांबून हाका !
मला न्याल तेव्हां नको चार खांदे
मला फ़क्त नेतील ओढून हाका !
मला फ़क्त नेतील ओढून हाका !
तुला रोज येतील पश्चात माझ्या
विजेच्या रूपाने नभातून हाका !
विजेच्या रूपाने नभातून हाका !
२.
पुन्हा फ़ासले भस्म भाळावरी मी पुन्हा ठेवला चंद्र माथ्यावरी
बघू लागते का पुन्हा ती समाधी पुन्हा सोडले चित्त वा-यावरी !
बघू लागते का पुन्हा ती समाधी पुन्हा सोडले चित्त वा-यावरी !
जरी शृंखलावार होते मिरवले इथे डंख काळे निळे आजवर
तरीही म्हणे पाय द्यावा कशाला तुझ्यासारख्याने भुंजगावरी ?
तरीही म्हणे पाय द्यावा कशाला तुझ्यासारख्याने भुंजगावरी ?
किती धावलो अन कुठे पोचलो मी कधी थांबलो वा कुठे राहिलो ?
कुणीही मला हे विचारू नये मी किती सोडले अश्व काळावरी !
कुणीही मला हे विचारू नये मी किती सोडले अश्व काळावरी !
जरा सुर्य क्षितिजाकडे पांगल्यावर किती लांब गेले थवेच्या थवे
कुठे जायचे या विचारात होता उभा एक पक्षी किना-यावरी !
कुठे जायचे या विचारात होता उभा एक पक्षी किना-यावरी !
कळाले तुला तर मला सांग त्यांनी चढाईत केला कशाचा उदो
खरे सांगना शेवटी मोजल्यावर किती लोक होते उतारावरी ?
खरे सांगना शेवटी मोजल्यावर किती लोक होते उतारावरी ?
उशाला असा रोज ठेऊन वणवा कसा काय डोळा तुझा लागतो ?
अशाही मला फ़क्त दिसतात आता तुझ्या सुरकुत्या या बिछान्यावरी !
अशाही मला फ़क्त दिसतात आता तुझ्या सुरकुत्या या बिछान्यावरी !
जणू रक्त झाले अनासक्त माझे झुकू लागलो मी विरक्तीकडे
तनाने मनाने जिव्हा वासनेने मिळवलाय ताबा लगामावरी !
तनाने मनाने जिव्हा वासनेने मिळवलाय ताबा लगामावरी !
कधी जन्मल्या एक आशेवरी मी किती दूर हा जन्मही न्यायचा
कितीदा पुन्हा सांग ठेवायचा मी भरोसा अशा ठोकताळ्यावरी ?
कितीदा पुन्हा सांग ठेवायचा मी भरोसा अशा ठोकताळ्यावरी ?
३.
याहुनी काहीच नाही आज देण्यासारखे
का फ़ुलांना लावते संदर्भ माझ्यासारखे ?
का फ़ुलांना लावते संदर्भ माझ्यासारखे ?
या नभाची लालसा मी ठेवली नाही पुन्हा
ती मला देऊन गेली रंग पाण्यासारखे !
ती मला देऊन गेली रंग पाण्यासारखे !
तो कफ़ल्लकही मला आता विचारू लागला
हे घराणे कोणते माझ्या घराण्यासारखे ?
हे घराणे कोणते माझ्या घराण्यासारखे ?
हात या हातात दे अन एकदा चालून बघ
जर तुला दिसतात रस्ते बंद झाल्यासारखे !
जर तुला दिसतात रस्ते बंद झाल्यासारखे !
एवढेही श्वास रोखुन तू मला पाहू नको
यातही काढेल दुनिया अर्थ वा-यासारखे !
यातही काढेल दुनिया अर्थ वा-यासारखे !
बदल थोडा कोन आधी तू मला बघण्यातला
मग बघूया कोण दिसते लख्ख नाण्यासारखे !
मग बघूया कोण दिसते लख्ख नाण्यासारखे !
एवढा शुल्लक बहाणा का पुढे केलास तू
भेटले नसणार कारण दूर जाण्यासारखे !
भेटले नसणार कारण दूर जाण्यासारखे !
मी तिच्यासाठी पणाला लावले आयुष्य अन
ती म्हणे विसरून जा सगळे जुगारासारखे !
ती म्हणे विसरून जा सगळे जुगारासारखे !
राहिली माझ्याप्रमाणे अढळ माझी वेदना
दुःख होते का बघूया धृव्रता-यासारखे !
दुःख होते का बघूया धृव्रता-यासारखे !
४.
उन्हातानात डोळ्यांनी तुला ओवाळले होते
तुझे जाई-जुईचे हात मी कवटाळले होते !
तुझे जाई-जुईचे हात मी कवटाळले होते !
तुझ्या वेणीत मी केवळ त्रिवेण्या माळल्या कारण
तुझ्या केसांवरी आधीच गजरे भाळले होते !
तुझ्या केसांवरी आधीच गजरे भाळले होते !
घडी तू मोडली नाही कधी माझ्या रुमालाची
तुझ्या गालांवरी अश्रू हवेने वाळले होते !
तुझ्या गालांवरी अश्रू हवेने वाळले होते !
अताशा रागही येतो जरासा डाग पडल्याचा
फ़ुलाइतके मला कोणीतरी सांभाळले होते !
फ़ुलाइतके मला कोणीतरी सांभाळले होते !
तुझी ती आर्जवी पत्रे कधी जाळू न शकलो पण
तुझ्या हस्ताक्षराचे कोपरे मी जाळले होते !
तुझ्या हस्ताक्षराचे कोपरे मी जाळले होते !
धगीनेही अताशा हात माझा पोळतो कारण
निखारे याच हातांनी कधी हाताळले होते !
निखारे याच हातांनी कधी हाताळले होते !
मला ठाऊक माझ्यावर उद्या फ़ुटणार या लाटा
असेही दुःख दगडाचे कुणी कुरवाळले होते ?
असेही दुःख दगडाचे कुणी कुरवाळले होते ?
बरे झाले सुदैवाने पुढे त्यांची गझल झाली
तुझ्या पश्चात काही शब्दही रेंगाळले होते !
तुझ्या पश्चात काही शब्दही रेंगाळले होते !
५.
एवढे निघतात हे मोर्चे कशाने ?
ती म्हणाली क्या पता सब रामजाने !
ती म्हणाली क्या पता सब रामजाने !
माज आहे की उन्हावर राग आहे
चेहरा का झाकला आहे फ़ुलाने ?
चेहरा का झाकला आहे फ़ुलाने ?
पाहते बाहेर खिडकीच्या कशाला ?
चक्क खिडकीआत असताना मनाने !
चक्क खिडकीआत असताना मनाने !
एवढ्यातच शाल जर गुंडाळली तू
मग कुठे जावे पहाटेच्या दवाने ?
मग कुठे जावे पहाटेच्या दवाने ?
प्रश्न वैतागुत तिने केला टीसीला
कोचही भरताय का आरक्षणाने ?
कोचही भरताय का आरक्षणाने ?
एक म्हातारी मला होती म्हणाली
"काय जाते रे जरा जागा दिल्याने ?"
"काय जाते रे जरा जागा दिल्याने ?"
राबली असणार शेतावर मुले ही
काय घेऊ विकत.. कुठल्या दराने ?
काय घेऊ विकत.. कुठल्या दराने ?
हे मला वाटायला वाटेलही पण
काय होते एकट्याला वाटल्याने ?
काय होते एकट्याला वाटल्याने ?
या निकालांनीच बट्ट्याबोळ केला
घोळ नव्हता घातलेला कायद्याने !
घोळ नव्हता घातलेला कायद्याने !
हे ससे लढतात सगळ्या धोरणांवर
मोजक्या गोष्टीत कासव जिंकल्याने !
मोजक्या गोष्टीत कासव जिंकल्याने !
माकडांना बोलताना ऐकले मी
माणसाचे काय केले माणसाने ?.
माणसाचे काय केले माणसाने ?.
शोधला आजार माझ्या ऐपतीचा
मी उद्या मरणार सर्दी खोकल्याने !
मी उद्या मरणार सर्दी खोकल्याने !
No comments:
Post a Comment