उर्दू-गुजरातीतली वृत्त वापरण्याची पद्धत उच्चारी वजनानुसार काही नवीन बंधने आणते तर काही ठिकाणी गुरुचे लघु उच्चार स्वीकार्य धरून मोकळीक पण देते. काही मुद्दे मांडतो.
१) उच्चारी वजन बंधनकारक आहे. कमल, हृदय, सरल चे वजन लगा च घेता येते. गाल किंवा ललल चालत नाही. चेहरा-> गागा करवत->गागा आणि सफरचंद-> लगागाल.
२) सूट घेतांना श्ब्दांती आणि सूटा एकाक्षरी गुरु लघु म्हणून घेता येतो.
३) ओळीच्या शेवटी येणाऱ्या लघुची मात्रा मोजत नाही.
४) व्यंजनस्वर संयोग - चालत आहे -> गागा गागा. पण चालताहे -> गालगागा हे पण स्वीकार्य आहे.
...........................
१.
...........................
१.
नजर मिळायची उरात धडधडायचे
तुला ही व्हायचे कि ते मलाच व्हायचे?
.
तुला ही व्हायचे कि ते मलाच व्हायचे?
.
मी आरश्यासमोर जे सरावले सतत
तू भेटली की तेच शब्द अवघडायचे
.
तू सांग ना सरळसरळ जगू नको म्हणून
हे काय म्हणते मी तुला न आठवायचे
.
तू भेटली की तेच शब्द अवघडायचे
.
तू सांग ना सरळसरळ जगू नको म्हणून
हे काय म्हणते मी तुला न आठवायचे
.
तुझ्या विना ही सांज उदास, मी ही सूर्यगत
जराजरा जळत हळूहळू विझायचे
जराजरा जळत हळूहळू विझायचे
२.
जेव्हा माझ्या सोबत असतो
तो असतो पण कितपत असतो
.
कोठे हुज्जत घालत असतो
मी सर्वांशी सहमत असतो
.
इकडे बुद्धी रोखत असते
तिकडून मोह खुणावत असतो
.
तो असतो पण कितपत असतो
.
कोठे हुज्जत घालत असतो
मी सर्वांशी सहमत असतो
.
इकडे बुद्धी रोखत असते
तिकडून मोह खुणावत असतो
.
मग मी काय ठरवले असते
मी जर सारे ठरवत असतो
.
स्टेशन आले की तो उतरणार
कोण कुणाच्या सोबत असतो
.
राख जरी दिसते वरच्या वर
आत निखारा धुमसत असतो
.
तेच अडीच अक्षर ना जमले
रोज मी कित्ता गिरवत असतो
मी जर सारे ठरवत असतो
.
स्टेशन आले की तो उतरणार
कोण कुणाच्या सोबत असतो
.
राख जरी दिसते वरच्या वर
आत निखारा धुमसत असतो
.
तेच अडीच अक्षर ना जमले
रोज मी कित्ता गिरवत असतो
३.
जन्म म्हणजे हा एक क्षण आहे
बाकी सगळंच बस आठवण आहे
.
आत शब्दांचा लावा धगधगतोय
मौन वरवरचे आवरण आहे
.
वाटतंय वाट संपतेय इथे
जीवनाचे अजब वळण आहे
.
पडलो प्रेमात तेव्हा दिसले कुठे
पुढच्या रस्त्यास अशी चढण आहे
.
जन्म घालवता येतो सोबत, पण
आपले आपले मरण आहे
बाकी सगळंच बस आठवण आहे
.
आत शब्दांचा लावा धगधगतोय
मौन वरवरचे आवरण आहे
.
वाटतंय वाट संपतेय इथे
जीवनाचे अजब वळण आहे
.
पडलो प्रेमात तेव्हा दिसले कुठे
पुढच्या रस्त्यास अशी चढण आहे
.
जन्म घालवता येतो सोबत, पण
आपले आपले मरण आहे
४.
पुन्हा जन्मलीये मनात एक आशा
बघूया पुढे काय होतो तमाशा
.
तू प्रत्यक्ष भेटू शकत नाही, ठीकेय
तू स्वप्नात पण येत नाही अताशा
.
कशाला तू देतेस कानांना तसदी
जिथे बोलतात ओठ ओठांची भाषा
.
महालात राहणारी हृदयात राहशील?
जमेल का तुला या घरात एवढ्याशा?
.
सहज हिंडण्याची मजा घेऊ हेमंत
कशाला हवाये नकाशा बिकाशा?
बघूया पुढे काय होतो तमाशा
.
तू प्रत्यक्ष भेटू शकत नाही, ठीकेय
तू स्वप्नात पण येत नाही अताशा
.
कशाला तू देतेस कानांना तसदी
जिथे बोलतात ओठ ओठांची भाषा
.
महालात राहणारी हृदयात राहशील?
जमेल का तुला या घरात एवढ्याशा?
.
सहज हिंडण्याची मजा घेऊ हेमंत
कशाला हवाये नकाशा बिकाशा?
५.
देत नाही मी माझी ग्वाही कधी
मी असाये कधी तसा ही कधी
.
एक तुझी आठवण सतत येते
आणि एक तू की येत नाही कधी
.
प्रश्न इतके मलाच का पडतात?
प्रश्न पडतो मला असा ही कधी
.
नेहमी समजूत काढतेस माझी
घे ना समजून तू मला ही कधी
.
कोणाकोणाशी बोलत असतेस तू?
ऐक माझी व्यथाकथा ही कधी
मी असाये कधी तसा ही कधी
.
एक तुझी आठवण सतत येते
आणि एक तू की येत नाही कधी
.
प्रश्न इतके मलाच का पडतात?
प्रश्न पडतो मला असा ही कधी
.
नेहमी समजूत काढतेस माझी
घे ना समजून तू मला ही कधी
.
कोणाकोणाशी बोलत असतेस तू?
ऐक माझी व्यथाकथा ही कधी
६.
जरी थाप आहे, तरी वाटते
ती तू मारली की खरी वाटते
.
जगाने मला सुन्न केले की मी
तुला पाहतो, तरतरी वाटते
.
ती नउ 'क'ची हेमांगिनी कामदार
मला आजकल का परी वाटते
.
अबोल्याने रुंदावलेली ती भेग
अताशा मला एक दरी वाटते
.
मी माझ्या व्यथेला दिले शब्दरूप
तुला चक्क ती शायरी वाटते
- हेमंत पुणेकर
ती तू मारली की खरी वाटते
.
जगाने मला सुन्न केले की मी
तुला पाहतो, तरतरी वाटते
.
ती नउ 'क'ची हेमांगिनी कामदार
मला आजकल का परी वाटते
.
अबोल्याने रुंदावलेली ती भेग
अताशा मला एक दरी वाटते
.
मी माझ्या व्यथेला दिले शब्दरूप
तुला चक्क ती शायरी वाटते
- हेमंत पुणेकर
No comments:
Post a Comment