१.
जिथे आकाश आहे त्या तिथे होते सरोवर
अशी मी कोरडी नव्हते तुझी होण्याअगोदर....
अशी मी कोरडी नव्हते तुझी होण्याअगोदर....
जखम प्रत्येक हिरवीगार आहे पालवीगत
चढू नाही दिले वारूळ मीही सांत्वनावर...
चढू नाही दिले वारूळ मीही सांत्वनावर...
जिथे भिडली नजर फूलपाखरू जन्मास येई
तुझ्या स्पर्शात आला रोकडा व्यवहार नंतर...
तुझ्या स्पर्शात आला रोकडा व्यवहार नंतर...
नभाला टांगलेल्या पाळण्यातच झोपते जग
जरी आकाशगंगा वर नभाच्याही नभावर...
जरी आकाशगंगा वर नभाच्याही नभावर...
नको माघार ! दुनिये वासना मोकाट कर तू..
तुझी आहे तशीही भिस्त कोठे संयमावर ?
तुझी आहे तशीही भिस्त कोठे संयमावर ?
२.
याही घरात नाही त्याही घरात नाही
शांती मला हवी ती या पिंज-यात नाही
याही घरात नाही त्याही घरात नाही
शांती मला हवी ती या पिंज-यात नाही
केलीत लाख शकले माझीच मी नव्याने
तुकड्यात सापडे जे अख्ख्या मनात नाही
तुकड्यात सापडे जे अख्ख्या मनात नाही
आल्यात टोळधाडी नासायला पिकाला
ही रात्रकाजव्यांची भुरटी वरात नाही
ही रात्रकाजव्यांची भुरटी वरात नाही
माणूस वर्दळीच्या कोलाहलात मेला
सांगा जगास येथे कोणी रहात नाही
सांगा जगास येथे कोणी रहात नाही
वेड्या सखूप्रमाणे दिसतोय पूल हल्ली
शहरास जाग आहे मुलगा घरात नाही ....
शहरास जाग आहे मुलगा घरात नाही ....
मी रोज ओढणीचे आभाळ सावरावे
तू रोज दाखवावे की तू पहात नाही
तू रोज दाखवावे की तू पहात नाही
३.
काळोखाचा बोळा करता येतो
उजेड केव्हाही चुरगळता येतो
काळोखाचा बोळा करता येतो
उजेड केव्हाही चुरगळता येतो
डोळे मिटुनी घट्ट.. करुणा भाका
त्यालाही अंधार मोजता येतो
त्यालाही अंधार मोजता येतो
तुझा दिलेला स्कार्फ़ अजुनी आहे
त्याचा अजुनी शेला करता येतो
त्याचा अजुनी शेला करता येतो
झोपेमध्ये नाव कुणाचे घेशी ...
मला तसा अंदाज बांधता येतो
मला तसा अंदाज बांधता येतो
तुला स्वत:ला हॅंडल करणे जमते ?
मला निखारा हाती धरता येतो
मला निखारा हाती धरता येतो
मला मनाचे विमान करता येते
तुला मनाचा वारा करता येतो ?
तुला मनाचा वारा करता येतो ?
४.
सुटकेची शक्यता अता वाढीस लागली आहे
अग्नीबाणाला पृथ्वीची कक्षा कळली आहे
ज्यांना नव्हते बदलायाचे अभिमानाचे सदरे
सोयीसाठी त्यांनीदेखिल कात टाकली आहे ...
सोयीसाठी त्यांनीदेखिल कात टाकली आहे ...
गळ्याभोवती साप टाकुनी मिरवत बसण्यासाठी
आज समुद्राच्या लाटांनी नदी उचलली आहे
आज समुद्राच्या लाटांनी नदी उचलली आहे
ट्रेन चालल्या सुरळित पाणी केव्हाचे ओसरले
टीव्ही बघणा-यांपुरती ती न्यूज चालली आहे
टीव्ही बघणा-यांपुरती ती न्यूज चालली आहे
झोपेचा वरचष्मा चढवुन कसा फायदा होइल
जर आशावादी स्वप्नांची काच तडकली आहे
जर आशावादी स्वप्नांची काच तडकली आहे
खरे चेहरे दृष्टिपथाला कसे बरे पडतिल जर ,
अभिमानाची चादर सर्वांनीच ओढली आहे
अभिमानाची चादर सर्वांनीच ओढली आहे
पांढरपेशांच्या पेशींचे संशोधन होऊ द्या
इतकी वर्षे कशी वेदना आत कोंडली आहे
इतकी वर्षे कशी वेदना आत कोंडली आहे
५.
तुला बरसायचे तर जा खुल्या रानीवनी
फुकट जाईल गिरगावात अवघी सिंफनी
तुला बरसायचे तर जा खुल्या रानीवनी
फुकट जाईल गिरगावात अवघी सिंफनी
कलेवर वासनेचे शेवटी आलेच वर
ढवळला तळ कशाला घेउनी तू मंथनी
ढवळला तळ कशाला घेउनी तू मंथनी
सकाळी सातची लोकल पकडतो रोज तो
जरी केव्हाच आहे बंद पडली कंपनी ...
जरी केव्हाच आहे बंद पडली कंपनी ...
तिला तो रोज रात्री दूरदेशी सोडतो
तरी देहात घोटाळे विकाराची 'मनी' ....
तरी देहात घोटाळे विकाराची 'मनी' ....
जुने पोस्टर नव्हे नुसते पडिक भिंतीवरिल
तड्यांना घेतले झाकून मी आलिंगनी...
तड्यांना घेतले झाकून मी आलिंगनी...
जरा सोफ़ा इथे खुर्च्या तिथे इतका बदल
घराचा रंग पूर्वीचाच आहे बैंगनी...
घराचा रंग पूर्वीचाच आहे बैंगनी...
कुठे गेले कधी गेले कधी येइन परत
तुझी आयुष्यभर चालूच आहे छाननी..
तुझी आयुष्यभर चालूच आहे छाननी..
- शिल्पा देशपांडे
No comments:
Post a Comment