काही मनात नव्हते तू भेटलीस तेव्हा
एकेक स्वप्न खुलले तू भाळलीस तेव्हा
एकेक स्वप्न खुलले तू भाळलीस तेव्हा
देणार ना कधी मी ते सुर्य चंद्र तारे
माळेन रोज चाफा तर हासलीस तेव्हा
माळेन रोज चाफा तर हासलीस तेव्हा
चालेन सोबतीने काट्याकुट्यात मी ही
रक्ताळ पावलांनी तू चाललीस तेव्हा
रक्ताळ पावलांनी तू चाललीस तेव्हा
तू नाव घे म्हणालो ,एकांत माळताना
गंधीत इश्श झाले तू लाजलीस तेव्हा
गंधीत इश्श झाले तू लाजलीस तेव्हा
भुलतोय आरसा ही माझ्यासवे तुझ्यावर
तिरका कटाक्ष सजतो तू गायलीस तेव्हा
तिरका कटाक्ष सजतो तू गायलीस तेव्हा
शपथा अनेक घेतो ,भजतो तुलाच राणी
मी प्रेमवेडा दिवाणा तू भावलीस तेव्हा
मी प्रेमवेडा दिवाणा तू भावलीस तेव्हा
करतो पुजा तुझी मी ,देतो प्रसाद माया
जपजाप्य सोडले मी तू खेटलीस तेव्हा
जपजाप्य सोडले मी तू खेटलीस तेव्हा
२.
ती ही मजेत अडके या चाकरीत माझ्या
म्हणते खुशाल फसतो तो साखळीत माझ्या
म्हणते खुशाल फसतो तो साखळीत माझ्या
भटके उन्हात जेव्हा आणावयास पाणी
घेते क्षणी विसावा ,ती सावलीत माझ्या
घेते क्षणी विसावा ,ती सावलीत माझ्या
चाफा ,गुलाब ,मोगर फुलतो मिठीत जेव्हा
मातीस गंध लाभे या झोपडीत माझ्या
शोधून आज दमले , जागा परोपकारी
मी ही मलाच खेटे या पोकळीत माझ्या
मी ही मलाच खेटे या पोकळीत माझ्या
जन्मास लेक आली ,उत्सव मनात भरला
भासे अबोल आई या छोकरीत माझ्या
भासे अबोल आई या छोकरीत माझ्या
ती रात्र पावसाळी ,होता मिठीत चाफा
सजला अबोल मोहर ह्या ओंजळीत माझ्या
सजला अबोल मोहर ह्या ओंजळीत माझ्या
ना चंद्र सोबतीला ,ना साथ काजव्यांची
जळतो मुकाट अश्रू या देवळीत माझ्या
जळतो मुकाट अश्रू या देवळीत माझ्या

No comments:
Post a Comment