म्होरके जावून तेथे पाय चाटू लागले
कास्तकारांचे इथे काळीज फाटू लागले
ठेवला विश्वास हा का कास्तकारांचा गुन्हा
दुश्मनांचे तख्त त्यानां खास वाटू लागले
काय उलट्या काळजाची माणसे असती पहा
ढापल्या मलिद्यावरी संसार थाटू लागले
देखणे दिसणे बघा हा शाप ठरतो या इथे
कोंडुनी घरट्यात पक्षी पंख छाटू लागले
पाहिला हतबल इथे त्यांच्यापुढे मी कायदा
गोरगरिबांचे बघा अनुदान लाटू लागले
कास्तकारांचे इथे काळीज फाटू लागले
ठेवला विश्वास हा का कास्तकारांचा गुन्हा
दुश्मनांचे तख्त त्यानां खास वाटू लागले
काय उलट्या काळजाची माणसे असती पहा
ढापल्या मलिद्यावरी संसार थाटू लागले
देखणे दिसणे बघा हा शाप ठरतो या इथे
कोंडुनी घरट्यात पक्षी पंख छाटू लागले
पाहिला हतबल इथे त्यांच्यापुढे मी कायदा
गोरगरिबांचे बघा अनुदान लाटू लागले
- बबन धुमाळ
No comments:
Post a Comment