१.
शहरामधले दुस्तर जगणे झेपत नाही का
दोघांच्याही पगारामधे भागत नाही का
दोघांच्याही पगारामधे भागत नाही का
घरामधे पूर्वीगत घरपण उरले नाही ना
मुले, नोकरी, प्रवास... दगदग सोसत नाही का
मुले, नोकरी, प्रवास... दगदग सोसत नाही का
विश्वासाने जवळ घेउनी बोल तिच्याशी तू
रात्री उशिरापर्यंत मुलगी झोपत नाही का
रात्री उशिरापर्यंत मुलगी झोपत नाही का
उत्कटता, आवेग, ओढ, आतुरता, हळवेपण
लग्नानंतर काही काही राहत नाही का
लग्नानंतर काही काही राहत नाही का
समाज इतका दुबळा, इतका रोगट का झाला
त्यास जिंदगी अंगावरती पाजत नाही का
त्यास जिंदगी अंगावरती पाजत नाही का
२.
वेळ फुटण्याची अशी येऊ नये
वाफ इतकीही कधी कोंडू नये
वाफ इतकीही कधी कोंडू नये
तू कधी सोबत रहा इतके तरी
की स्वतःला एकटे वाटू नये
की स्वतःला एकटे वाटू नये
मुक्तता हा सापळा असतो नवा
मन कुठेही मोकळे सोडू नये
मन कुठेही मोकळे सोडू नये
वाट असती लागली बहुधा पुढे
मार्ग अपुला चांगला सोडू नये
मार्ग अपुला चांगला सोडू नये
वाटते आभाळसुद्धा पिंजरा
जीव घरट्याने असा लावू नये
जीव घरट्याने असा लावू नये
ठेवतो मी मन खुले हे नेहमी
म्हणुन कोणीही उगी उचकू नये
म्हणुन कोणीही उगी उचकू नये
लाख हे शिकलोय मन मारायला
मात्र स्वप्नांचा गळा घोटू नये
मात्र स्वप्नांचा गळा घोटू नये
हेच समजेना मला झालेय की
एवढेही का तुला समजू नये
एवढेही का तुला समजू नये
वाटते आहे बरे, आलीस तू
वाटते आहे, बरे होऊ नये...
वाटते आहे, बरे होऊ नये...
३.
नशा मदाऱ्याला तर गर्दी जमवायाची होती
खाज माकडालाही टाळ्या मिळवायाची होती
खाज माकडालाही टाळ्या मिळवायाची होती
प्रमोट करुनी प्रजातीकडुन बेडुक ग्लोबल झाला
विश्वालाच सफर डबक्याची घडवायाची होती
विश्वालाच सफर डबक्याची घडवायाची होती
फडात नाचवली शालिनता, फिकीर कोणा नाही
ह्याला त्याची, त्याला ह्याची जिरवायाची होती
ह्याला त्याची, त्याला ह्याची जिरवायाची होती
याचमुळे येड्यांची जत्रा भरवित आलेला तो
छबिन्यासंगे हौस स्वतःला मिरवायाची होती
छबिन्यासंगे हौस स्वतःला मिरवायाची होती
भरायास खळगी पोटाची तारेवरची कसरत
डोंबाऱ्याला कोठे अक्कल कमवायाची होती
डोंबाऱ्याला कोठे अक्कल कमवायाची होती
नियतीने नेमके धाडले तिथेच मधुमेह्याला
कैक दुकाने जेथे रुचकर हलवायाची होती
कैक दुकाने जेथे रुचकर हलवायाची होती
मिळेल भरपाई लाखाची म्हणून रोगर प्याला
कर्जाहुनही मोठी मुलगी उजवायाची होती...
कर्जाहुनही मोठी मुलगी उजवायाची होती...
उत्तररात्री पिंगळबोली ऐकत भटकायाचा
त्यास कशाची गहन उत्तरे मिळवायाची होती
त्यास कशाची गहन उत्तरे मिळवायाची होती
धुपासारखे दरवळायला धुनी ठेवली पेटत
मला फकीरी माझ्यामधली जगवायाची होती
मला फकीरी माझ्यामधली जगवायाची होती
बरे पाहिला मी चिमणीच्या चोचीमधला खाऊ
मला गिलवरीने ती चिमणी उडवायाची होती...
मला गिलवरीने ती चिमणी उडवायाची होती...
४.
नेसून का बसतेस तू साडी सतत
दिसते तुझ्यामध्ये मुली, आई सतत
दिसते तुझ्यामध्ये मुली, आई सतत
बापास असते काळजी, धास्ती सतत
घिरट्या कुणाची घालते गाडी सतत
घिरट्या कुणाची घालते गाडी सतत
विटलीय माझ्या खेळण्याला जिंदगी
मग कोण हे देते मला चावी सतत
मग कोण हे देते मला चावी सतत
होईल मृगजळ पार हे होते कळत
'बुडशील' होता म्हणत नावाडी सतत
'बुडशील' होता म्हणत नावाडी सतत
तो नायकाजागी स्वतःला पाहतो
तो गुंग होउन पाहतो मूव्ही सतत
तो गुंग होउन पाहतो मूव्ही सतत
असतो तसा संपर्क आता फोनवर
भेटायचो आम्ही कधीकाळी सतत
भेटायचो आम्ही कधीकाळी सतत
नात्यास देतो मानभावी नाव बस
निरखीत असतो आतली मादी सतत
निरखीत असतो आतली मादी सतत
न्हाल्यामुळे तर समजला चौथा दिवस
राहील गजबजती पुन्हा माडी सतत
राहील गजबजती पुन्हा माडी सतत
येउन तुझ्यापाशी वितळतो मी कसा
बनवत मला गेलोय पोलादी सतत
बनवत मला गेलोय पोलादी सतत
अंतिम क्षणी मग मी मुसंडी मारली
(तू घेत आलेलास आघाडी सतत)
(तू घेत आलेलास आघाडी सतत)
५.
काय तू पाहिलेस धाडस बे
जीवना, दे अजून खुन्नस दे
जीवना, दे अजून खुन्नस दे
चाचणी घे करून स्वप्नाची
वाटते जर तुला अनौरस ते
गांजलेली खुणावती नाती...
भेट तू... पण जरूर 'पारस' ने
भेट तू... पण जरूर 'पारस' ने
ठेव बाजूस सभ्यता खुळचट
चल करूयात जाम भंकस, ये
चल करूयात जाम भंकस, ये
एक वितभर मला ख़ुशी दे तू
घर हवे त्यास लाख चौरस दे
घर हवे त्यास लाख चौरस दे
तो खरोखर तसा हवा होता
तोच, दिसतोय जो निरागस रे
तोच, दिसतोय जो निरागस रे
सौख्य देऊ नकोस एकसुरे
वेदनांचा सुरेल कोरस दे
वेदनांचा सुरेल कोरस दे
लाज वाटे प्रभो स्वतःचीही
मागणी तीच... तेच मानस हे
मागणी तीच... तेच मानस हे
खूप काही अरे घडू शकते
काढ आधी मनात आकस जे
काढ आधी मनात आकस जे
छान आहे तुझ्यात गुणवत्ता
मात्र कुठलीतरी शिफारस दे !
मात्र कुठलीतरी शिफारस दे !
No comments:
Post a Comment