द्वेषामध्ये जगतो आम्ही
उगाच खोटे हसतो आम्ही..
दिसतो आम्हा फास तरीही
आपुलकीने फसतो आम्ही..
माझे माझे करता करता
जीवनात या झिजतो आम्ही..
नदीकिनारी फुशारकीने
घर मातीचे रचतो आम्ही..
शान तिरंगा,मान तिरंगा
एकदाच तर रटतो आम्ही..
मुलगी रडते मंडपात अन्
हुंड्यांसाठी रुसतो आम्ही..
-शरद काळे
No comments:
Post a Comment