या घराला सावरावे लागते
अन स्वतःलाही पहावे लागते
अन स्वतःलाही पहावे लागते
रोखुनी अश्रू खरे मग लोचनी
रोज खोटे बघ हसावे लागते
रोज खोटे बघ हसावे लागते
नाव गंगा ठेवले हे तू जरी
कोरडे तिजला वहावे लागते
स्त्री कुठे निर्धास्त आहे एकटी ?
काळजी सोबत रहावे लागते
काळजी सोबत रहावे लागते
फिरवतो हातात सूत्रे तो जशी
बाहुली सम तिज वळावे लागते
बाहुली सम तिज वळावे लागते
मुक्त ती नुसतेच म्हणती लोक हे
लेक म्हटली की जपावे लागते
लेक म्हटली की जपावे लागते
२.
खोटेच बोल आता ,सत्यास मोल नाही
केली जरी इथे बघ जाहीर लोकशाही
केली जरी इथे बघ जाहीर लोकशाही
बोलेल आज भाषा त्यांचीच कायदा अन्
आरोप ही तुझ्यावर ,खोटाच कोणताही
आरोप ही तुझ्यावर ,खोटाच कोणताही
विकतात रोज येथे ,आण्यात ते स्वत:ला
पण ! थाट मात्र त्यांचा भलताच बादशाही
पण ! थाट मात्र त्यांचा भलताच बादशाही
येणार ना कधी ते कामास कोणत्याही
नुसतीच दाखवाया सरसावतील बाही
नुसतीच दाखवाया सरसावतील बाही
पक्षास पंख त्यांच्या, नसले जरी तरी पण
उडतात हे कसे बघ, हल्ली दिशेस दाही
उडतात हे कसे बघ, हल्ली दिशेस दाही
लागू नयेच आपण नादास फार त्यांच्या
संबंध कोणता ही ,ठेवू नये जरा ही
संबंध कोणता ही ,ठेवू नये जरा ही
कोषात राहु दे वा डबक्यात नाचु दे ते
अडते कुठे जगाचे त्यांच्याशिवाय काही
अडते कुठे जगाचे त्यांच्याशिवाय काही
३.
वेदना होतात जेव्हाही अनावर
ताणही येतोच ना या लोचनांवर
ताणही येतोच ना या लोचनांवर
द्यायचे नाही ठरवते लक्ष मी पण !
जखम तर होतेच ना तरिही मनावर
जखम तर होतेच ना तरिही मनावर
एव्हढे सोपे कुठे त्याला उठवणे ?
जे कुणी बसले मनाच्या आसनावर
जे कुणी बसले मनाच्या आसनावर
तू दिल्या काही खुणांना मिरवते मी
दागिन्यांच्या सारखे माझ्या तनावर
दागिन्यांच्या सारखे माझ्या तनावर
दोष याचा देत नाही मी तुला अन
ठेवला नाहीच माझ्या प्राक्तनावर...
ठेवला नाहीच माझ्या प्राक्तनावर...
४.
स्वप्न माझी पेरतो ,शेतात मी जर
उगवती का फास हे चोहीकडे मग ?
उगवती का फास हे चोहीकडे मग ?
पेरतो ते उगवते हा, नियम आहे
का उगा हे ,नियम सारे, मोडते जग ?
का उगा हे ,नियम सारे, मोडते जग ?
कोरड्या शेतात माझ्या थेंब ना पण!
आसवांचे रोज का हे बरसती ढग?
आसवांचे रोज का हे बरसती ढग?
दागिना ना घेतला तिजला कधी मी
कर्ज माझे फेडण्या पण मोडतो नग!
कोठला हा न्याय देवा सांग मजला
सोसवेना काळजाला एवढी धग
सोसवेना काळजाला एवढी धग
- ज्योत्स्ना राजपूत
No comments:
Post a Comment