१.
तो समजावा मानव पक्का धार्मिक आहे
जो 'शपथे'वर सांगे की मी नास्तिक आहे
जो 'शपथे'वर सांगे की मी नास्तिक आहे
स्पर्शाची जर गोडी वाटे तव प्रेमाला
ते आकर्षण पुरते मित्रा लैंगिक आहे
ते आकर्षण पुरते मित्रा लैंगिक आहे
सजली होती दुःखे माझी पानावरती
वाचक म्हणती कविता फारच मार्मिक आहे
वाचक म्हणती कविता फारच मार्मिक आहे
उघडा असतो कायम माझा दरवाजाही
येणे जाणे तुमचे येथे ऐच्छिक आहे
येणे जाणे तुमचे येथे ऐच्छिक आहे
चिडलो जर मी घाबरण्याचे कारण नाही
रागावरती शिक्का माझ्या सात्त्विक आहे
रागावरती शिक्का माझ्या सात्त्विक आहे
द्यावा लागे मोबदला जर सुखशांतीचा
प्रियकर होणे प्रेमा खूपच खर्चिक आहे
प्रियकर होणे प्रेमा खूपच खर्चिक आहे
जीवनमृत्यू शर्यत असते रंजक मोठी
क्षण फरकाने जीवन हरणे वैश्विक आहे
क्षण फरकाने जीवन हरणे वैश्विक आहे
२.
मुखावर साय येणारच, मनाचा तळ उकळताना
कसे खोटे हसावे मी, जखम ताजी उमलताना..?
कसे खोटे हसावे मी, जखम ताजी उमलताना..?
जगाला फक्त दाखवतो, तुझ्यामाझ्यातले बंधन
कशी विण घट्ट व्हावी ती पुन्हा धागे उसवताना
कशी विण घट्ट व्हावी ती पुन्हा धागे उसवताना
जराशी गंजलेली पण सुबक अगदी तिची मूर्ती
मला आत्ताच सापडली जुन्या गोष्टी उपसताना
मला आत्ताच सापडली जुन्या गोष्टी उपसताना
जरी मी रोज आवरतो मनाची ध्वस्त अलमारी
उगाचच हात थरथरतो तिचा कप्पा उघडताना
उगाचच हात थरथरतो तिचा कप्पा उघडताना
उकल करतोच लिलया मी हजारो कूटप्रश्नांची
तरी साक्षात गडबडतो तिचे कोडे उकलताना
तरी साक्षात गडबडतो तिचे कोडे उकलताना
किती होतो उताविळ मी तिथे जाण्यास मुक्कामी
विसावा व्यर्थ वाटावा मला रस्ता उरकताना
विसावा व्यर्थ वाटावा मला रस्ता उरकताना
तिच्याशी चार दिवसांचा असे संसार मित्रांनो
पडावे स्वप्न काव्याचे व्यथेची कुस उजवताना
अता ते फोल ठरणारच तुझे अंदाज आयुष्या
ठरवले मी लढायाचे विडा हाती उचलताना
ठरवले मी लढायाचे विडा हाती उचलताना
मला सोडून जाताना नको चिंता कलंकाची
मनाने लख्ख व्हावे मी तुझा माथा उजळताना
मनाने लख्ख व्हावे मी तुझा माथा उजळताना
३.
मायबोलीची लहर शहरात येते
इंग्रजी शाळा जशी खेड्यात येते
इंग्रजी शाळा जशी खेड्यात येते
ढेकळाचा देव जर झाला भुकेला
पावसाची पालखी स्वप्नात येते
पावसाची पालखी स्वप्नात येते
हरवलेल्या वासराला शोधताना
एक आई थेट बाजारात येते
एक आई थेट बाजारात येते
सोसवेना सावलीला झळ उन्हाची
भरदुपारी आपल्या पायात येते
भरदुपारी आपल्या पायात येते
कागदाचे मोल ती सांगून जाते
नोट जेव्हा फाटकी कामात येते
नोट जेव्हा फाटकी कामात येते
अंगणाचा आपल्या विस्तार होता
पांगलेली भावकी दारात येते
पांगलेली भावकी दारात येते
हाय ! मौजेशी घडे शृंगार जेव्हा
वेदनाही नेमकी लाडात येते
वेदनाही नेमकी लाडात येते
No comments:
Post a Comment