अहवाल : देव उपाध्ये




माझे 'प्रशांत' होणे ज्यांनी अमान्य केले
त्यांचा मिळून येथे झाला तलाव आहे...!

अहवाल वाचायचं सौभाग्य आज मिळालं !! वाढ दिवसाच्याही शुभेच्छा थोडं उशिरानं !! मनस्वी नि सिध्दहस्त गझलकार, नव्या गझलकारांना प्राेत्साहित करणारा एक मोठ्या मनाचा माणुस, राज्याच्या राजधानीत गझल रुतविणारा गझलकार, सुरेश भटांच सानिध्य लाभलेला नि साक्षात भटांनी गौरवविलेला व आदरानं नाव घेतल्या जाणार्‍या गझलकांपैकी एक !!
मांडून प्रदर्शन केंव्हा ठेवले न मी दु:खाचे
जखमांशी सलगीसुद्धा अश्रूंच्या नकळत केली...!

"अहवाल" हा संग्रह परिपुर्ण आहे. ९३ अत्याेत्तम गझलांची पर्वणी!! प्रेमकाव्य असो वा सामाजिक भाष्य दोन्ही विषयावर लिहताना वैद्य यांची कलम शिताफिने चालते. त्यांनी फार प्रेमाने मला त्यांचा अहवाल पाठविला. या योगायोगाने मी अहवाल नि प्रशांत वैद्य यावर दोन शब्द लिहायचा प्रयत्न करतोय. वैद्यांच वैशिष्ट म्ह्मणजे त्यांना विषयाचं वावगं नाहिचं. सामाजिक असो, आर्थिक असो वा रोमॅंटिक ! त्यांचा हातखंडा !! रोमॅंटिक गझलेविषयी ते फार संयमानं लिहतात जसं,
ऋतू कुठला तुझ्या दारी गडे रेंगाळतो आहे
तुझ्या शहरातला रस्ता फुलांनी वाहतो आहे...!

किंवा

भेटली आहेस तु ही छान आता
राहिले नाही वयाचे भान आता

प्रेमाला वय नसंत असं म्हणतात. व पु काळे एकदा म्हणाले होते, प्रेयसीच्या वया एवढंच प्रियकराचं वय असतं. हाच आशय वैद्यांनी छान मांडलाय. प्रेमावरच जरा वज्र लिहताना ते म्हणतात,
फारसा न गुंततो तुझ्यात आजकाल मी
आजकाल पाहतो तुझ्यासवे दलाल मी...!

दलाल हा एक शब्द भयानता दाखनुन जातो. प्रेमाचं झालेलं बाजारीकरण अधोरेखाकिंत करतो. त्यामुळेच मग एक वैराग्याची भावना निर्माण हिते नि वैद्य म्हणतात.
भाळलो नाही कधीही मेनकांना
साधनेला मी न केव्हा स्वस्त केले...!

तर कधी कधी ते गतकाळात जावुन त्या आठवणिंमधे रममान होताना त्यांच्या अहवालात म्हणतात,
रस्त्यात ओळखीचा एकांत भेटला
काही जुन्या क्षणांनी चमकून पाहिले…!

जुने क्षण जुन्या स्मृती सगळं सगळं कसं डोळ्यासमोरुन भर्कन जातं. नि मला हे सर्व प्रेम करुन खरचं काय हाती लागलं याचा हिशोब जेव्हा ते स्वत:लाच विचारतात तेव्हा हताश होवुन बोलुन जातात की,
मोजली जेंव्हा कधी मी अंतरीची मालमत्ता
सौख्य हे जंगम निघाले वेदना सा-याच स्थावर...!

शेवटी तिच्यावर प्रेम करुन मिळविले काय?तर. . तर चा हिशेबच नसतो. वैद्यांची घेउनी सौख्यास. . या गझलेतील हा शेर बघा
वाचले आहे मला तु लाखवेळा हे निखालस
त्याविना का काळजाचे पान आहे फाटलेले

किती उंत्तुग खयाल आहे. हे वाचलं नि भटांचा शेर डोळ्यापुढे आला
हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले.
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?

इतक्याच दर्जाचा वैद्यांचा वरील शेर.
प्रशांत वैद्य लंबी बहर चे शेर वा गझलही छान नि भरपुर लिहतात जसे
मनात त्यांच्या शिरता कळले रस्ता चुकला माझा
त्यांच्यापाशी फक्त मुखवटा उरला सुंदर आहे…!

किंवा

विजेप्रमाणे कडाडले अन अखेर त्यांनी निषेध केला
खरेच आंदोलनात त्यांच्या निमंत्रितांचा बिघाड होता…! ( अहवाल)

किंवा

मला घालू नको मृत्यू अनाठायी तुझी भीती
उभे आयुष्य जगलो मी चितेवर घालुनी मांडव...! ( अहवाल)

किंवा

रोज मी मृत्यूस माझ्या चल निघू या म्हणत असतो
रोज तो रेंगाळतो…अन … रोजचा मी मरत असतो…! ( अहवाल)

मृत्युवरील दोन्ही शेर भटांचा शेरांची आठवण करुन देतात, त्यामुळे समिक्षक कदाचित त्यांच्यावर सुरेश भटांचा प्रभाव आहे असेही म्हणतील परंतु मला ते मान्य नाही कारण याला प्रभाव म्हणत नसुन स्पर्श म्हणतात. दर्जा नि उंत्तगता कश्याला म्हणयची असते हेच बघायचे झाल्यास वैद्य यांच्या "तुझा नि माझा ठावठिकाणा. ." या गझलेतील एक शेर बघा,
लिहिणारी कुठलीच लेखणी जन्मापासुन रखेल नसते
पुढे पुढे ती होते कारण तिला हवा बाजार असावा...!

किती मोठा खयाल. आज प्रत्येकाला प्रसिध्दी हवी नि त्यासाठी ते काहिही करायला तयार असतात. सवंग प्रसिध्दीसाठी काहीही लिहुन आम्ही किती बोल्ड आहोत हे दाखविण्यात धन्यता मांडतात. वाहवा मिळविण्याच्या नादात साहित्याचा खेळखंडोबाही करतात. या वाहवा हुन मला शुभानन चिंचकरांचा एक शेर आठवला,
लेखकूंची किती उच्च प्रतिभा पहा -
पुस्तके वाचते वाळवी … वाहवा !
(शुभानन चिंचकर)

लेखणीचा बाजार किंवा आजार न होता कामा फक्त स्वीकार व्हायला हवा. जसं लांब बगरच्या गझल वैद्य छान लिहतात तसचं छोटी बहरच्याही गझल तितक्याच ताकतीनं लिहतात. जसं,
तापली धरा किती
आज कोसळुन दे

मिलनाशी संबधित हा शेर, त्याचं येणं मुळी, अगदी धसमुसळं असतं. वादळ, वारा, ढगांचा गडगडाट... आणि, विजेच्या कडकडाटासहित. बहुतेक.. बऱ्याच दिवसांच्या विरहानंतर, या 'धरतीला' भेटण्यासाठी. त्याचं मन, आसुसलेलं असावं. जसा.. एखादा प्रियकर,आपल्या प्रेयसीला बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर. देहभान विसरून, तिच्यावर तुटून पडतो. प्रेमाचा 'वर्षाव' करतो. अगदी तश्या आशयाचा हा शेर. किंवा ह्याच आशयाचा हा शेर,
अशी असावी मिठी तुझी की
मी व्हावे तू. .तू माझ्यामय
(अहवाल)

किंवा
मला वाटले प्रेमपत्र ते
जखमांचे फर्मान मिळाले
(अहवाल)

किंवा
केवढी ही हातघाई
थांब थोडा वेळ बाई. .!
(अहवाल)

गझलेतील सर्व प्रकार नि सर्व विषय प्रशांत वैद्य चांगल्या रितीने हाताळतात म्हणुनच त्यांची गझल ही लोकप्रिय होते नि मनाला भुरळ पाडते. अहवाला ला साजेशी प्रस्तावना जेष्ठ गझलकार म.भा.चव्हाणांची लाभली आहे. अहवाल दर्जेदार, बहरदार नि कसदार गझलांचा एक उत्तम गझलसंग्रह !! त्यांना पुन्हा एकवार शुभेच्छा!!

- देव उपाध्ये

No comments: