याद येतो मला तो असा सारखा
जीव माझा मला जाहला पारखा
जीव माझा मला जाहला पारखा
थेंब माझे इथे कैद मेघांमधे
दूर तू त्या तिथे चातकासारखा
दूर तू त्या तिथे चातकासारखा
चालतो जप असा आठवांचा तुझ्या
देह होतो जणू देवळासारखा
देह होतो जणू देवळासारखा
हाय गेला मनाचा ऋतू ओसरुन
तू उशिरा पुन्हा श्रावणासारखा
तू उशिरा पुन्हा श्रावणासारखा
मोकळे सोडतो आत घेतो पुन्हा
तो असा आपलासा... घरासारखा
तो असा आपलासा... घरासारखा
खून , दंगे , दगे अन् दरोडे, गुन्हे
वागतो देव का पत्थरासारखा !
वागतो देव का पत्थरासारखा !
२.
किती कोंडला आतला पावसाळा
तुला भेटता पेटला पावसाळा
तुला भेटता पेटला पावसाळा
कहाणी जरा ऐकुनी सांग माझी
तुझ्या आत का दाटला पावसाळा?
तुझ्या आत का दाटला पावसाळा?
कुणाला कुणाची तरी याद आली
अचानक कसा बरसला पावसाळा !
अचानक कसा बरसला पावसाळा !
भिजवले अता शेत मी आसवांनी
न जाणो कुठे थांबला पावसाळा
न जाणो कुठे थांबला पावसाळा
तुला भेटण्या सांग येऊ कशी मी ?
मला गाठण्या थांबला पावसाळा
मला गाठण्या थांबला पावसाळा
३.
शाळा तर मैलामैलांवर
विद्यार्थ्यांची बोंब पटावर
शाळा तर मैलामैलांवर
विद्यार्थ्यांची बोंब पटावर
नैतिक मूल्ये दुर्मिळ झाली
गुणवत्ता ठरते मार्कांवर
गुणवत्ता ठरते मार्कांवर
हा कसला सम्राट बळी ?
कर्ज जयाच्या नित्य शिरावर
कर्ज जयाच्या नित्य शिरावर
शहरांची लागण खेड्यांना
माणूस उरला ना पारावर
माणूस उरला ना पारावर
हूल दिली तव स्मरणांना पण
तव स्मरणे माझ्या मागावर
तव स्मरणे माझ्या मागावर
४.
जीव ओवाळला वाहिली आसवे
आरतीला तुझ्या , काळजाचे दिवे
आरतीला तुझ्या , काळजाचे दिवे
मी तुला धाडले , शेर काही नवे
ते न साधे सुधे...भावनांचे थवे
ते न साधे सुधे...भावनांचे थवे
रोज छळतो तुला , रोज छळतो मला
गाव स्वप्नातला का कुणा सोडवे ?
गाव स्वप्नातला का कुणा सोडवे ?
पांघरुनी सुखे बंगले झोपले
झोपडीची पुसावी कुणी आसवे ?
झोपडीची पुसावी कुणी आसवे ?
मी जरा मांडली आज माझी व्यथा
का रडू लागला तूच माझ्यासवे !
का रडू लागला तूच माझ्यासवे !
रात्र होईलही बघ प्रवासामधे
अंतरी आपल्या ठेव तू काजवे
अंतरी आपल्या ठेव तू काजवे
५.
विझवुन टाका नात्यांमधली ठिणगी लवकर
प्रेतच उरते नात्यांचे वणवा झाला तर
प्रेतच उरते नात्यांचे वणवा झाला तर
स्पर्शुन जातो तव गावाचा वारा मजला
वितळुन जाते मी ; आणिक दव माझे थरथर
वितळुन जाते मी ; आणिक दव माझे थरथर
माय नि बाप गया , की अन् मक्का , मदिना
याहुन दुसरे तिर्थ समजते मी अवडंबर
याहुन दुसरे तिर्थ समजते मी अवडंबर
जगणे वैशाखाचा वणवा धगधगणारा
जगणे कसले जगणे तू सोडुन गेल्यावर
जगणे कसले जगणे तू सोडुन गेल्यावर
मी इतरांच्या आयुष्याचा परिस बनावे
माझ्या आयुष्याचे सोने व्हावे नंतर
माझ्या आयुष्याचे सोने व्हावे नंतर
६.
करणार कसे चोळामोळा
स्वप्न नव्हे पालापाचोळा
स्वप्न नव्हे पालापाचोळा
तू गेल्याने जीव बिचारा
केव्हा मासा , केव्हा तोळा
केव्हा मासा , केव्हा तोळा
बोला मनाशी , बोल मनाने
देह अरे पालापाचोळा
देह अरे पालापाचोळा
तूच मला सावर ना थोडे
वय अवघे माझे बस सोळा
वय अवघे माझे बस सोळा
एक दिवस बस उत्सव नुसता
महिलादिन किंवा मग पोळा
महिलादिन किंवा मग पोळा
No comments:
Post a Comment