१.
उगी राहुनी जिथे तिथे का, हार मानते सहजपणे ?
येत राहते उर्मी त्याला, मीच मिटवते सहजपणे
येत राहते उर्मी त्याला, मीच मिटवते सहजपणे
प्रत्येकाचे ऐकत बसुनी, मनासारखे कसे जगू
सर्वांचे ठेवुनी मनी मी, माझे करते सहजपणे
सर्वांचे ठेवुनी मनी मी, माझे करते सहजपणे
कधी आक्रमक होणेही तर, बरेच असते जिथे तिथे
विरोधकांचा सूर संपुनी, काम चालते सहजपणे
विरोधकांचा सूर संपुनी, काम चालते सहजपणे
अंतर असते दोघांमध्ये, मैलोन् मैल किती तरी
तुझ्याचसाठी जगते म्हणता, सांध संपते सहजपणे
तुझ्याचसाठी जगते म्हणता, सांध संपते सहजपणे
समाधान का मनास नसते, सारे काही मिळूनही
हवेपणाची ओढ नसावी, शांत राहते सहजपणे
हवेपणाची ओढ नसावी, शांत राहते सहजपणे
२ .
जन्मताच गोड कळी, का माजे खळबळ
मुलीस का समजावे, घरातली अडगळ
मुलीस का समजावे, घरातली अडगळ
मन वेडे नित्य सुखा, शोधत का बसते
गझल होय सोबतीण, मग कशास हळहळ
गझल होय सोबतीण, मग कशास हळहळ
सर्व सुखे जगातली, मिळो हीच इच्छा
मिळे त्यात समाधान, करू नको खळखळ
मिळे त्यात समाधान, करू नको खळखळ
माणुसकीचा अनुभव, मुलीस का नाही
काळोख्या जगात ती, मनास ही तळमळ
काळोख्या जगात ती, मनास ही तळमळ
उगाळणे दु:खाला, सोडुनी जगावे
धीटपणे सामोरे, हीच खरी चळवळ
धीटपणे सामोरे, हीच खरी चळवळ
- डाॅ.शरयू शहा
No comments:
Post a Comment