पावलागणिक वाट, रोखतात माणसे.
साम,दाम, दंड, भेद ,जाणतात माणसे.
साम,दाम, दंड, भेद ,जाणतात माणसे.
जातपात वर्तुळास , आखण्यास भोवती.
आपला परीघ पंथ, काढतात माणसे.
आपला परीघ पंथ, काढतात माणसे.
आपसात बोलतात, झाकुनीच चेहरे
आरश्यास का उगाच, टाळतात माणसे.
आरश्यास का उगाच, टाळतात माणसे.
उत्सवात नाचतात, कामकाज सोडुनी
आपल्या घरात देव,वाटतात माणसे.
आपल्या घरात देव,वाटतात माणसे.
दानधर्म देवळात, चालला अमाप तो
मायबाप आश्रमात, धाडतात माणसे.
मायबाप आश्रमात, धाडतात माणसे.
जात कोणती म्हणून, ना जरी विचारले.
नेमक्या क्षणीच जात, दावतात माणसे.
नेमक्या क्षणीच जात, दावतात माणसे.
२.
आकाश हे फुलांनी, लागेल मोहरू.
ही रात चांदण्याची, हलकेच पांघरू.
आला फुलून आला, मधुमास वैखरी .
आता कळ्याफुलांनी, हे श्वास मंतरू.
आता कळ्याफुलांनी, हे श्वास मंतरू.
का हात तारकांचे, मेंदीत रंगले?
ते रंग, गंध सारे,स्वप्नी नव्या भरू.
ते रंग, गंध सारे,स्वप्नी नव्या भरू.
आगीत या मधाच्या, सर्वांग पेटले.
दोघे धगीत त्याच्या, जिवितास सावरू.
दोघे धगीत त्याच्या, जिवितास सावरू.
ओठातल्या सुरांना, संधी हवी नवी .
अनुराग भावनांचा, आता पुरा करू.
अनुराग भावनांचा, आता पुरा करू.
एकेक आठवांनी, उजळेल चांदणी .
सहवास लाभण्याला , आतूर पाखरू.
सहवास लाभण्याला , आतूर पाखरू.
बेभान त्या क्षणांना, जे रान मोकळे .
ती रानवाट सारी , ह्रदयांतरी स्मरू.
ती रानवाट सारी , ह्रदयांतरी स्मरू.
हा चंद्र लाजणारा , तो चंद्र गोजिरा.
कोणास मी स्मरू अन् , कोणास विस्मरू?
कोणास मी स्मरू अन् , कोणास विस्मरू?
No comments:
Post a Comment