छायाचित्र : अशोक वानखडे
_________________________________________
२o१२ पर्यंतचे अंक गझलकार ह्या मुख्य ब्लाॅगवर प्रकाशित केलेत.नंतरच्या प्रत्येक अंकाचा स्वतंत्र ब्लाॅग करून प्रत्येक अंकाचा मुखवटा आकर्षक होण्यासाठी वेगवेगळ्या टेम्पलेटचा उपयोग झाला. मुख्यब्लाॅगसह आजवरच्या सर्व अंकांची एक लक्षाहून अधिक पृष्ठे जगभर वाचली गेली.आणि मराठी गझलचे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन झाले.
प्रस्तुत अंकात गझलांच्या समृद्धविभागासोबतच काही महत्वाचे लेख आहेत.गझलांच्या वृत्तातली लवचिकता अत्यंत सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न माझ्या लेखात मी केला आहे.सोबत विवेक काणेंचा लेख आणि हेमंत पुणेकरांच्या उच्चारी वजनातल्या सहा मराठी गझला एकत्र वाचल्या तर प्रात्यक्षिकासह गझलांच्या वृत्तातली लवचिकता सहजपणे लक्षात यावी.
गेल्या दोन-तीन वर्षात प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहातील गझलांचा आस्वाद घेणारा एक स्वतंत्र विभाग हे या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरावे. मराठीत आज लिहिल्या जात असलेल्या गझलांच्या प्रवाह-प्रवृत्तींचे प्रतिबिंब या वर्षीच्या अंकातील गझलात,लेखात सुस्पष्टपणे दिसावे, असा प्रामाणिक प्रयास केला आहे.
मित्रवर्य शाहीर सुरेशकुमार वैराळकर,युवा गझलकारमित्र अमोल शिरसाट यांच्या बहुमोल सहकार्याशिवाय ह्या अंकाची सिद्धता अशक्य होती.औपचारिक आभार मानणे दोघांनाही आवडणारे नाही.

१८ फेब्रुवारी २oo८ च्या रात्री माझे आवडते शायर सुदर्शन फ़ाकिर हे जग सोडून गेले.दुसऱ्या दिवशी सकाळी मराठी वर्तमानपत्रात पाच-सात ओळींची बातमी छापून आलेली होती.मराठीत इतरत्र कुठेच काही छापलेलं नव्हतं.इतर कुणाची वाट न पाहता आपणच काहीतरी लिहिलं पाहिजे. फ़ाकिर यांच्या मराठी चाहत्यांपर्यंत पोचवलं पाहिजे.असं प्रकर्षानं वाटलं आणि 'गझलकार' ब्लाॅग सुरू केला.आणि श्रद्धांजलीपर पहिली पोस्ट लिहिली.
सप्टेबर येता येता ब्लाॅगवर विशेषांक करण्याची कल्पना सुचली.तो दिवाळीला न करता दसऱ्याला करावा असं ठरलं. आणि पहिलावहिला सीमोल्लंघन २oo८ चा छोटेखानी अंक रात्रभर जागून बरोबर दसऱ्याला ऑनलाइन प्रकाशित केला. आज ह्या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली. २o१६ आणि २o१७ ह्या दोन वर्षाचे अंक माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निघू शकले नाहीत. ह्या वर्षीच्या गझलकारांच्या उदंड प्रतिसादाने ती कसर पूर्णपणे भरून निघाली.
सप्टेबर येता येता ब्लाॅगवर विशेषांक करण्याची कल्पना सुचली.तो दिवाळीला न करता दसऱ्याला करावा असं ठरलं. आणि पहिलावहिला सीमोल्लंघन २oo८ चा छोटेखानी अंक रात्रभर जागून बरोबर दसऱ्याला ऑनलाइन प्रकाशित केला. आज ह्या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली. २o१६ आणि २o१७ ह्या दोन वर्षाचे अंक माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे निघू शकले नाहीत. ह्या वर्षीच्या गझलकारांच्या उदंड प्रतिसादाने ती कसर पूर्णपणे भरून निघाली.
२o१२ पर्यंतचे अंक गझलकार ह्या मुख्य ब्लाॅगवर प्रकाशित केलेत.नंतरच्या प्रत्येक अंकाचा स्वतंत्र ब्लाॅग करून प्रत्येक अंकाचा मुखवटा आकर्षक होण्यासाठी वेगवेगळ्या टेम्पलेटचा उपयोग झाला. मुख्यब्लाॅगसह आजवरच्या सर्व अंकांची एक लक्षाहून अधिक पृष्ठे जगभर वाचली गेली.आणि मराठी गझलचे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन झाले.
प्रस्तुत अंकात गझलांच्या समृद्धविभागासोबतच काही महत्वाचे लेख आहेत.गझलांच्या वृत्तातली लवचिकता अत्यंत सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न माझ्या लेखात मी केला आहे.सोबत विवेक काणेंचा लेख आणि हेमंत पुणेकरांच्या उच्चारी वजनातल्या सहा मराठी गझला एकत्र वाचल्या तर प्रात्यक्षिकासह गझलांच्या वृत्तातली लवचिकता सहजपणे लक्षात यावी.
गेल्या दोन-तीन वर्षात प्रकाशित झालेल्या गझलसंग्रहातील गझलांचा आस्वाद घेणारा एक स्वतंत्र विभाग हे या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरावे. मराठीत आज लिहिल्या जात असलेल्या गझलांच्या प्रवाह-प्रवृत्तींचे प्रतिबिंब या वर्षीच्या अंकातील गझलात,लेखात सुस्पष्टपणे दिसावे, असा प्रामाणिक प्रयास केला आहे.
मित्रवर्य शाहीर सुरेशकुमार वैराळकर,युवा गझलकारमित्र अमोल शिरसाट यांच्या बहुमोल सहकार्याशिवाय ह्या अंकाची सिद्धता अशक्य होती.औपचारिक आभार मानणे दोघांनाही आवडणारे नाही.
उत्तरोत्तर अधिक चांगलं,अधिक उत्तम लिहिण्यासाठी सर्व गझलकार,लेखक यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
जगभरच्या वाचकांसह
सर्वांना
दसरा-दिवाळीच्या अंतःकरणपूर्वक शुभकामना.
अंकासंबंधी प्रतिक्रिया अवश्य कळवा.
व्हाॅटस् अॅप : 8275087370
◆ श्रीकृष्ण राऊत
◆ सुरेशकुमार वैराळकर
◆ अमोल शिरसाट
________________________________________
गझलकार सीमोल्लंघन २o१८ चे प्रकाशन
मा.उदयदादा लाड यांचे हस्ते
ऑनलाइन क्लीक करून...

i
व्हिडिओ क्लीप : कीर्ती वैराळकर-इंगोले
No comments:
Post a Comment