१.
मनात या तुझे वसंत मी जपून ठेवले
सुखातल्या क्षणाक्षणास मी रचून ठेवले
सुखातल्या क्षणाक्षणास मी रचून ठेवले
मनातल्या मनात मी तुला जपून ठेवले
अश्याच जिंदगीस या जरा हसून ठेवले
अश्याच जिंदगीस या जरा हसून ठेवले
असेन मी नसेनही तरी तुझाच सोबती
क्षणातले धुके जसे तुला सजून ठेवले
क्षणातले धुके जसे तुला सजून ठेवले
फुलातला सुगंधही तुझ्यामुळेच येतसे
प्रभा मलाच भेटता रडू लपून ठेवले
प्रभा मलाच भेटता रडू लपून ठेवले
लहानशाच काळजात वेदना म्हणे मला
तुझ्या मनात कोपरा हळू करून ठेवले
तुझ्या मनात कोपरा हळू करून ठेवले
अशीच मध्यरात्र ती पुन्हा पुन्हाच आठवे
समुद्र आसवातले तिचे तरून ठेवले
समुद्र आसवातले तिचे तरून ठेवले
पिण्यात पाजण्यातली मजाच और साबरी
कशास ग्लास आजही तरी भरून ठेवले!
२.
कशास ग्लास आजही तरी भरून ठेवले!
२.
हे जीवना दे तू दिशा उकलायचे आरंभले
दु:खास या राजीखुशी उचलायचे आरंभले
दु:खास या राजीखुशी उचलायचे आरंभले
रोखू नका कोणी इथे ओठावरी फुलपाखरे
प्राशून घे मधुमास ही भिजवायचे आरंभले
प्राशून घे मधुमास ही भिजवायचे आरंभले
होती भिती न्यायालयी झोपू शकेना आज ही
आता इथे सज्जन भले मिळवायचे आरंभले
आता इथे सज्जन भले मिळवायचे आरंभले
ही फाटलेली जिंदगी इतिहास साक्षीला उभे
आशेत सारी जिंदगी मिरवायचे आरंभले
आशेत सारी जिंदगी मिरवायचे आरंभले
ती चूक झाली मानतो तू माफ कर आतातरी
विश्वात या विश्वासही बसवायचे आरंभले
विश्वात या विश्वासही बसवायचे आरंभले
कोणी मुका बहिरा कुणी अन आंधळा ही पाहतो
यांच्या अश्या सवयीस ही तुडवायचे आरंभले
यांच्या अश्या सवयीस ही तुडवायचे आरंभले
साबिर उन्हाळा पावसाळा अन हिवाळा पाहिला
आपापल्या वेळेस ते हलवायचे आरंभले
आपापल्या वेळेस ते हलवायचे आरंभले
३.
तुझ्यावर प्रेम केले मी जगाला कल्पना आहे
तुझ्या स्मरणातल्या त्या-त्या क्षणाला कल्पना आहे
तुझ्या स्मरणातल्या त्या-त्या क्षणाला कल्पना आहे
तुझ्या डोळ्यात मी दिसतो तुझ्या देहामधे वसतो
तुझ्या हृदयातल्या हर स्पंदनाला कल्पना आहे
तुझ्या हृदयातल्या हर स्पंदनाला कल्पना आहे
जरी तू चोरपायांनी मला येतेस भेटाया
तरी या चोरभेटीची जगाला कल्पना आहे
तरी या चोरभेटीची जगाला कल्पना आहे
कळी जैशा तुझ्या नाजूक ओठांनी फुलावे मी
हळू स्पर्शून जाणाऱ्या सुखाला कल्पना आहे
हळू स्पर्शून जाणाऱ्या सुखाला कल्पना आहे
कशाला पाजते आहेस हा प्रेमातला प्याला
नशा सारी तुझी आहे मनाला कल्पना आहे
नशा सारी तुझी आहे मनाला कल्पना आहे
अरे ज्योतीमुळे ही आरती होतेच देवाची
शिदोरी पाप पुण्याची कुणाला कल्पना आहे
शिदोरी पाप पुण्याची कुणाला कल्पना आहे
कितींदा सांगतो साबिर सदा तू सोबती त्याचा
तिचा हे तुझा आहे उराला कल्पना आहे
तिचा हे तुझा आहे उराला कल्पना आहे
No comments:
Post a Comment