सौ विद्या देशमुख : दोन गझला



१ .
झाली जरी वयाची ही सांजवात आहे 
डोळ्यातली तरीही स्वप्ने भरात आहे

आला जरी उन्हाळा सल काळजात आहे 
मन भावना अजूनी ओल्या दवात आहे

ना भोग मानतो मी वृद्धत्व ही जगावे 
माझ्या मनात जपले शैशव उरात आहे

झेलून अनुभवांचे सारेच पावसाळे ही 
टाकली पुन्हा बघ मी आज कात आहे

झाली अधू नजर ही दृष्टीच दूर माझी 
जगणे नव्या युगाचे माझ्या खिशात आहे

अस्पष्ट येत बोली संगीत श्वास आहे ही 
ओढ मज स्वरांची गातो सुरात आहे

दमली सखी जरीही उत्साह दाट आहे 
जगलो तिच्यासवे मी , ती चांदरात आहे

आता कबूल करतो सरलाच खेळ सारा 
येईल उत्सवाने अंती वरात आहे

झाले जगून सारे ना खेद या मनाला 
भेटेल क्षण कसा तो मन संभ्रमात आहे  

२ .
कितीदा मज अडवले तू
किती दैवा रडवले तू

ढगांची ओल सरली अन्
सरींना त्या दडवले तू

किती हे देखणे दुखणे
मनी माझ्या जडवले तू

मला एकाच शब्दाने
कसे अलगद पटवले तू

शिगेला पोचली दु:खे
अशा वेळी हसवले तू

किती संस्कार देवूनी
मला आई घडवले तू

- सौ विद्या देशमुख

No comments: