कैक सा-या वेदनांना,आज मी हरवून आले;
दुःख माझे अंतरीचे,आज मी बुडवून आले!
दुःख माझे अंतरीचे,आज मी बुडवून आले!
आप्तकांच्या वादळांनी घात केला, भावनांचा;
जीवघेण्या वास्तवाला,आज मी सोसून आले!
जीवघेण्या वास्तवाला,आज मी सोसून आले!
काफिला होता व्यथांचा,सोबतीला रात्र वैरी;
रोखलेल्या आसवांना आज मी कोंडून आले!
रोखलेल्या आसवांना आज मी कोंडून आले!
स्पंदनाने रात्रभर जागीच असते दिवसभर ही;
चांदण्या रात्री उन्हाशी,आज मी सांगून आले!
चांदण्या रात्री उन्हाशी,आज मी सांगून आले!
काळजा मधल्या झ-यांनी,जाळ ज्योती वंचनांची;
हे खुलासे अन दिलासे,आज मी जाळून आले!
हे खुलासे अन दिलासे,आज मी जाळून आले!
२.
या सुखांचे मागणेही फार झाले;
दुःख माझेही, असे बेजार झाले!
दुःख माझेही, असे बेजार झाले!
आस होती आज तुजला भेटण्याची;
स्वप्न माझे आज , ते साकार झाले!
स्वप्न माझे आज , ते साकार झाले!
स्पर्श होता रात्र सारी धुंद झाली;
श्वासही माझे , सख्या अंगार झाले!
श्वासही माझे , सख्या अंगार झाले!
वेदनेचे सोसले , मी घाव सारे;
शब्दही तेव्हा, मुके आधार झाले!
शब्दही तेव्हा, मुके आधार झाले!
प्रेम जेव्हा दाटले, डोळ्यात माझ्या ;
आठवांना आसवांचे , भार झाले!
आठवांना आसवांचे , भार झाले!
- सौ. ज्योती. प. शिंदे
No comments:
Post a Comment