हरिपंडित : दोन गझला



१ .
दूर स्वर्गी मित्र हे आले कसे
राहिले का काय माघारी ठसे

गूढ आहे फार सांगावे कसे
बोलती हे एकमेका आरसे

कल्पना बाहेर आल्या या कश्या
बोललो नाही कुठे मी फारसे

राहिली तान्ही कुठे आता गझल
या कवीने आज धरले बाळसे

रोज येते ये तशी भेटून जा
ऐनवेळी व्हायचे माझे हसे


२ .
बांधले स्वप्नात घर
ठेवली नाही कसर

जा जपव शालीनता
निखळतो आहे पदर

लावलाकी वाजतो
हा पहाटेचा गजर

काय वाचावे तरी
रोजचे आहे सदर

ज्ञात नाही उत्तरे
दाबले कोणी बझर

धाक डोळ्याचा तिचा
सारखी आहे नजर

भिक आहे मागतो
जा जरासे काम कर

वेळ गेला वाटतो
गाव झाले ते शहर

- हरिपंडित 

No comments: