पाहिजे ते घडू लागले
मी तुला आवडू लागले
मी तुला आवडू लागले
तू असे शब्द मागू नको
लाजणे अवघडू लागले
लाजणे अवघडू लागले
पाहिजे थेट सांगायला
मन तुझ्यावर जडू लागले?
मन तुझ्यावर जडू लागले?
सोकवू लागले भेटणे
क्षण तुझ्याविन अडू लागले
क्षण तुझ्याविन अडू लागले
पावलाला दिली तू दिशा
सोबतीने पडू लागले
सोबतीने पडू लागले
जायला पाहिजे ना पुढे
थांबणे जर नडू लागले
थांबणे जर नडू लागले
वाचली मी तुझी शायरी
मी मला सापडू लागले
मी मला सापडू लागले
मी तुझी हासरी बासरी
या सुखाने रडू लागले
या सुखाने रडू लागले
२.
नसे वांझ इच्छा कधीही कुणाची
जसा संग तैसी प्रसूती मनाची !
जसा संग तैसी प्रसूती मनाची !
कसे प्रेम जडते कसा जीव जळतो
तुलाही चढावी नशा या सुखाची
तुलाही चढावी नशा या सुखाची
किती श्रेष्ठ वनवास हा उर्मिलेचा
खुजी एकके पण तिला तोलण्याची!
खुजी एकके पण तिला तोलण्याची!
मनाला मिळाला मनाचाच गुंता
मनी रोज शंका नव्याशा दमाची
मनी रोज शंका नव्याशा दमाची
जसा देह विकला उपाशी पशूला
तशी भूक शमली तिच्या लेकराची
तशी भूक शमली तिच्या लेकराची
सुखाचा गळाला बहर का अवेळी?
नजर लावण्याची सवय माणसाची
नजर लावण्याची सवय माणसाची
कधी लाट आली कधी लाट गेली
तरी कोरडी गाज का सागराची?
तरी कोरडी गाज का सागराची?
नियम बाद झाला तरी खेळ चाले
तुला साथ आहे तुझ्या कायद्याची
तुला साथ आहे तुझ्या कायद्याची
उपाशी नसावे कधीही कुणीही
कुणी प्रार्थना छापली ढेकराची?
कुणी प्रार्थना छापली ढेकराची?
तिला जात नाही,तिला धर्म नाही
तरी वाट झाली बिकट जीवनाची
तरी वाट झाली बिकट जीवनाची
कुणाला कुणाचे न घेणे न देणे
उरे लोकशाही दिखाऊपणाची
उरे लोकशाही दिखाऊपणाची
३.
माणसाने माणसाला जाळताना पाहिले
मी उन्हाने पावसाला झेलताना पाहिले
मी उन्हाने पावसाला झेलताना पाहिले
तो नकाराचा गुन्हाही दाद देण्यासारखा
काळजीने काळजाला तोडताना पाहिले
काळजीने काळजाला तोडताना पाहिले
हाय ओझे जाहलेले ज्यास आई बापही
त्यास डाॅगी पाळताना पोसताना पाहिले
त्यास डाॅगी पाळताना पोसताना पाहिले
भेट होती शेवटीची वाट होती संपली
बघ तुला मी वाट माझी पाहताना पाहिले
बघ तुला मी वाट माझी पाहताना पाहिले
टाळण्याजोगा गुलाबी प्रश्न आला आडवा
दृष्ट कोण्या उत्तराला लागताना पाहिले
दृष्ट कोण्या उत्तराला लागताना पाहिले
फारकत जर घेतलेली वायदे होते जुने
ती नव्याने काय करते? शोधताना पाहिले
ती नव्याने काय करते? शोधताना पाहिले
प्रेम ऐसी भावना झाली न केव्हाही कमी
या दुराव्यांनी तिला मी वाढताना पाहिले
या दुराव्यांनी तिला मी वाढताना पाहिले
हात हाती घेतलेले अन् मिठीही लाजली
चौघडा हृदयात त्याच्या वाजताना पाहिले
चौघडा हृदयात त्याच्या वाजताना पाहिले
पिंजरा वा पाप नाही प्रेम ऐसी साधना
तोडुनी सीमा तिला मी गुंतताना पाहिले
तोडुनी सीमा तिला मी गुंतताना पाहिले
मोक्ष म्हणजे काय त्याचा अर्थ जेव्हा लागला
धन्य झाले वादही मग संपताना पाहिले
धन्य झाले वादही मग संपताना पाहिले
ती मनाने मोगरा, तो चेह-याने देखणा
चांदण्याला अत्तरावर भाळताना पाहिले
चांदण्याला अत्तरावर भाळताना पाहिले
४.
शेवटी तू सांग बाकी काय होते ?
टाळण्याजोगे कुठे पर्याय होते ?
आज ज्यांनी मार्ग माझे रोखलेले
काल मी त्यांचेच झाले पाय होते
जेवढे द्यावे मनाला जास्त चटके
तेवढी घनदाट त्याची साय होते
रोज केल्या कत्तली,ते लोक ज्यांनी
ग्रंथ,पोथी वाचले अध्याय होते
ठाम होती लोकशाही आपली तर
का असे ओशाळलेले न्याय होते?
पाहिली नारीत केवळ माय ज्यांनी
ते खरे आदर्श नर शिवराय होते
अन्नदाते जीव देती का सुखाने?
फास केव्हाचे उपाशी हाय होते !
५.
येशूमधे मिळाला बुद्धामधे मिळाला
रामा तुझाच अनुभव अल्लामधे मिळाला
ध्यासात श्याम होता श्वासात श्याम होता
सारांश राधिकेचा श्यामामधे मिळाला
वारी उगा कराया का पंढरीस जावू?
माझा मला विठोबा कामामधे मिळाला
कोणी फकीर ,साई ,नानक, कबीर झाला
मीरे तुझा हवाला प्रेमामधे मिळाला
जेव्हा अशांत वादळ घाली मनात दंगा
शांतीतला विसावा ध्यानामधे मिळाला
"सर्वांस माफ कर तू माफीस पात्र बन तू"
साधाच मंत्र तोही वादामधे मिळाला
"बेतात बोल थोडे,खिदळू नकोस वेडे"
तुज हक्क हासण्याचा धाकामधे मिळाला
झाली जरी उपेक्षा ढळला न तोल माझा
माझाच हट्ट मजला ध्रुवामधे मिळाला
जाणीव होत गेली आकार सत्य नाही
माझा न चेहरा मग माझ्यामधे मिळाला
No comments:
Post a Comment