माणुसकीला सदैव केला नमस्कार मी
मानत नाही कधीच कुठला चमत्कार मी
मानत नाही कधीच कुठला चमत्कार मी
दीन दु:खितामधे खरा मी माणुस बघतो
व्यर्थ कुणाचा कधी न केला तिरस्कार मी
व्यर्थ कुणाचा कधी न केला तिरस्कार मी
अखेर कारागृही डांबले मलाच त्यांनी
अक्षरातुनी फ़क्त घडविला अविष्कार मी
अक्षरातुनी फ़क्त घडविला अविष्कार मी
वागु लागले शरीर जेव्हां मनाविरोधी
पूर्ण टाकला स्वत: स्वत:वर बहिष्कार मी
पूर्ण टाकला स्वत: स्वत:वर बहिष्कार मी
खुशाल घ्यावी हपापल्यांनी विकत बक्षिसे
रसिकांच्या टाळ्याच मानतो पुरस्कार मी
रसिकांच्या टाळ्याच मानतो पुरस्कार मी
शेर शेर एकेक गझलचा जगलो आधी
लाख वादळे सोसुन घडलो गझलकार मी
लाख वादळे सोसुन घडलो गझलकार मी
कशास घालू "गौरव" आता दागदागिणे
तिचे तेवढे घाव समजतो अलंकार मी
तिचे तेवढे घाव समजतो अलंकार मी
२.
काळ हा नाही तुझ्यासाठी बरा बाई
संस्कृतीला दे नव्याने हादरा बाई
संस्कृतीला दे नव्याने हादरा बाई
तं जिजाऊ, तू रमाई, तूच सावित्री
तू उद्याच्या क्रांतीचा आहे झरा बाई
तू उद्याच्या क्रांतीचा आहे झरा बाई
तू घडविले चेहरे अगणीत पुरूषांचे
अन् स्वत:चा तू हरविला चेहरा बाई
अन् स्वत:चा तू हरविला चेहरा बाई
एवढा टाकू नको विश्वास कोणावर
कोण आहे सभ्य सज्जन सोयरा बाई
कोण आहे सभ्य सज्जन सोयरा बाई
ही फुले ना राहिली साधीसुधी आता
ऐनवेळी घात करतो मोगरा बाई
ऐनवेळी घात करतो मोगरा बाई
तू नको अवघे ह्रदय देऊस कोणाला
एक राहू दे स्वत:चा कोपरा बाई
एक राहू दे स्वत:चा कोपरा बाई
ही धरा अंबर तुझे आहे भरारी घे
सोड तू आभूषणांचा पिंजरा बाई
सोड तू आभूषणांचा पिंजरा बाई
अडकुनी नात्यातल्या धाग्यामधे आता
तूच खाते "गौरवाने" ठोकरा बाई
तूच खाते "गौरवाने" ठोकरा बाई
३.
उदंड झाली असेल कीर्ती जगात माझी
अखेर अवहेलनाच झाली घरात माझी
अखेर अवहेलनाच झाली घरात माझी
तुझ्या धूर्त वांझ घोषणांनी मरू लागलो
कधी तरी ऐक एकदा 'मन कि बात' माझी
कधी तरी ऐक एकदा 'मन कि बात' माझी
कशी पांघरू झूल रेशमी अकादमीची
अभिव्यक्ती जर गुदमरते वादळात माझी
अभिव्यक्ती जर गुदमरते वादळात माझी
जेवण माझे काय असावे मला ठरवू दे
ओढतोस का पुढ्यातील तू परात माझी
ओढतोस का पुढ्यातील तू परात माझी
खुशाल इंद्रायणीत फेका पुस्तक आता
गझल कोरली रसिकांच्या काळजात माझी
गझल कोरली रसिकांच्या काळजात माझी
मरावया केलेस मला मजबूर काल तू
आज लावली प्रतिमा देवालयात माझी
आज लावली प्रतिमा देवालयात माझी
कुठेच मी झाड एकही लावले न साधे
उगाच का जाळता चिता चंदनात माझी?
उगाच का जाळता चिता चंदनात माझी?
४.
भाकरीचे खायला घे चिञ आता
प्यावया देतील ते गोमुत्र आता
प्यावया देतील ते गोमुत्र आता
श्वास घेणेही ठरावे देशद्रोही
एवढी जहरी हवा सर्वत्र आता
एवढी जहरी हवा सर्वत्र आता
यापुढे लावू नका गर्भास काञी
यार हो पुञीस माना पुत्र आता
यार हो पुञीस माना पुत्र आता
ठेवला बॅंकेत तू गडगंज पैसा
राहु दे ह्रदयात काही मित्र आता
राहु दे ह्रदयात काही मित्र आता
बोलणे झाले नको ते फोनव्दारे
वाटते की तू लिहावे पत्र आता
वाटते की तू लिहावे पत्र आता
काल होतो आजही माणूस आहे
कोणते सांगू तुम्हाला गोत्र आता ?
कोणते सांगू तुम्हाला गोत्र आता ?
एवढी अंतीम इच्छा "गौरवा"ची
या जगाला दान द्यावे नेत्र आता
या जगाला दान द्यावे नेत्र आता
५.
जन्म बापास देते नवा पोरगी
देश घडवावया वाचवा पोरगी
देश घडवावया वाचवा पोरगी
फूल बनते कधी फुलपाखरू कधी
रोज असते सुगंधी हवा पोरगी
रोज असते सुगंधी हवा पोरगी
पंख फुटल्यावरी दूर जाइल उद्या
आज नजरेमधे साठवा पोरगी
आज नजरेमधे साठवा पोरगी
ओल हृदयातली वीज गगनातली
ऐन ग्रीष्मातला गारवा पोरगी
ऐन ग्रीष्मातला गारवा पोरगी
तीच दसरा, दिवाळी असे पौर्णिमा
मायबापा असे पाडवा पोरगी
मायबापा असे पाडवा पोरगी
लिंगभेदास मानू नका यार हो
वाटतो "गौरवा" 'पोरगा' पोरगी
वाटतो "गौरवा" 'पोरगा' पोरगी
- गौरवकुमार आठवले
No comments:
Post a Comment