विद्या बनाफर : दोन गझला



१.
कधी हसतोय उंबरठा
कधी रडतोय उंबरठा

तिचे काळीज तुटताना
कसा बघतोय उंबरठा

घराच्या झाकतो लाजा
उगा सजतोय उंबरठा

वरी तोरण कसे हसते
नि गुदमरतोय उंबरठा

किती आले किती गेले
कुठे नडतोय उंबरठा

परी कर्तव्य करतांना
मुका जळतोय उंबरठा

जशी ती सासरी आली
तिला जपतोय उंबरठा

२.
‬थांब रे दुःखा तुझा धिक्कार आहे
थांब माझे सुख जरा गर्भार आहे
.
भावनांचे पीक ना होते कुठेही
बेगडांचा हा असा व्यापार आहे
.
सोडते का स्वप्न कोणी पाहणे ते
सत्य होती स्वप्न हा निर्धार आहे
.
तू अशी फुंकर जरा जखमेस देना
वेदनांचा बघ इथे बाजार आहे

- विद्या बनाफर

No comments: