ठेवला ज्यांनी शिरावर हात माझ्या
साप त्यांनी सोडले पायात माझ्या
साप त्यांनी सोडले पायात माझ्या
भाकरी रुसली अशी माझ्यावरी की
सूर्य दिसतो स्पष्ट हा ताटात माझ्या
सूर्य दिसतो स्पष्ट हा ताटात माझ्या
वाढली सवळसळ किती कर्मेंद्रियांची
बहरला कुठला ऋतू देहात माझ्या
बहरला कुठला ऋतू देहात माझ्या
बोलणारांची इथे खपतात बोंडे
एवढी साक्षर प्रजा देशात माझ्या
एवढी साक्षर प्रजा देशात माझ्या
वाटले असतील कुत्रे भुंकणारे
पाहतो तर माणसे दारात माझ्या
पाहतो तर माणसे दारात माझ्या
गारव्याला घाम फुटला चांदराती
तू मिसळता ओठ हे ओठात माझ्या
तू मिसळता ओठ हे ओठात माझ्या
हेलकावे खात आहे मन तिचेही
एवढी आहे नशा मौनात माझ्या
एवढी आहे नशा मौनात माझ्या
२.
भूक ही आधारशी जोडून टाका
भूकबंदी कायदा लावून टाका
भूकबंदी कायदा लावून टाका
मंदिरे बांधा पुन्हा पाडून शाळा
नोकरीचे प्रश्न ही मिटवून टाका
नोकरीचे प्रश्न ही मिटवून टाका
शब्दही जर बोलला कोणी विरोधी
देशद्रोही त्यासही ठरवून टाका
देशद्रोही त्यासही ठरवून टाका
फक्त बाकी राहिले इतुकेच आता
कास्तकाराला जिते गाडून टाका
कास्तकाराला जिते गाडून टाका
लोकशाहीच्या मुळावर वाढलेले
बांडगुळ धर्मांध हे छाटून टाका
बांडगुळ धर्मांध हे छाटून टाका
३.
सावली होऊन सोबत चालते
दुःख माझ्या आस-याने राहते
सोसवेना भार कर्जाचा मला
शेत माझे दुःख त्याचे सांगते
शेत माझे दुःख त्याचे सांगते
फाटका संसार माझा बोलला
काळजी कसली तुला रे वाटते
काळजी कसली तुला रे वाटते
सोसते चटके गरीबीचे जरी
पण तरीही घर सुखाने हासते
पण तरीही घर सुखाने हासते
एवढे आहे फुलांवर प्रेम तर
बाग वै-यासारखी का वागते
बाग वै-यासारखी का वागते
- लक्ष्मण उगले
No comments:
Post a Comment