कोरुन हवा श्वासांनी आकार फुलांचे केले
मी खोल जुन्या ज़ख़्मांना श्रृंगार फुलांचे केले
मी खोल जुन्या ज़ख़्मांना श्रृंगार फुलांचे केले
फुकटात घेतला नाही उपकार कधी कोणाचा
मी काट्यांच्या बाज़ारी व्यापार फुलांचे केले
मी काट्यांच्या बाज़ारी व्यापार फुलांचे केले
मी जिथे जिथे तुज दिसलो पोटाची वणवण होती
पण जिथे थांबलो तेथे शेजार फुलांचे केले
पण जिथे थांबलो तेथे शेजार फुलांचे केले
ह्र्दयाला जपण्यासाठी संसर्ग टाळण्यासाठी
मी अराजकावर काही मग वार फुलांचे केले
मी अराजकावर काही मग वार फुलांचे केले
पेटून इरेला त्यांनी रतनांची उधळण केली
मी हार देवतेसाठी लाचार फुलांचे केले
मी हार देवतेसाठी लाचार फुलांचे केले
गेलेत चरे काचेला दगडांच्या सौजन्याने
मी मात्र परत जे केले साभार फुलांचे केले
मी मात्र परत जे केले साभार फुलांचे केले
शिक्षेचा मानस नव्हता सातत्य भयंकर होते
जिवघेण्या असुयेसाठी अंगार फुलांचे केले
जिवघेण्या असुयेसाठी अंगार फुलांचे केले
छोटेसे घरकुल माझे आश्वस्त रहावे करिता
हे कुंपण आग्रह होता मी तार फुलांचे केले
हे कुंपण आग्रह होता मी तार फुलांचे केले
मी नाही दगडी भिंती नात्यात बांधल्या केव्हा
संसार नेटका केला घरदार फुलांचे केले
संसार नेटका केला घरदार फुलांचे केले
२.
संयमाचा तोल गेला पाहिजे
तर शिगोशिग गच्च पेला पाहिजे
तर शिगोशिग गच्च पेला पाहिजे
फेक जा डिग्री अता बेकार ती
तुज चहाचा एक ठेला पाहिजे
तुज चहाचा एक ठेला पाहिजे
पोट जाळुन भर विम्याची पोटगी
अन दुआ कर बाप मेला पाहिजे
अन दुआ कर बाप मेला पाहिजे
हासऱ्या प्रत्येक बाबाला इथे
भांडणारा मूर्ख चेला पाहिजे
भांडणारा मूर्ख चेला पाहिजे
पोट भरल्याला कुठे किंमत कळे
भाकरीला ही भुकेला पाहिजे
भाकरीला ही भुकेला पाहिजे
नाव माझे त्याविना होणार का?
सततचा मागे झमेला पाहिजे
सततचा मागे झमेला पाहिजे
शांतता देईल प्रगतिला दिशा
वाद कायम पेटलेला पाहिजे
वाद कायम पेटलेला पाहिजे
३.
जसा आहे तसा आहे
हवा तर घे असा आहे
हवा तर घे असा आहे
अता आहे अता नाही
कुणाचा भरवसा आहे
कुणाचा भरवसा आहे
किती देऊ तुला हाका
अरे हा ही घसा आहे
अरे हा ही घसा आहे
जरा निरखून पाहू दे
मला तू आरसा आहे
मला तू आरसा आहे
करू का शेर मी याचा
किती तू छानसा आहे
किती तू छानसा आहे
तुला शोधेन मी,कारण
सुगंधी वारसा आहे
सुगंधी वारसा आहे
मला ठाऊक नाही मी
कुठे आहे कसा आहे
कुठे आहे कसा आहे
बदलता मी ऋतू नाही
विचारांचा ठसा आहे
विचारांचा ठसा आहे
मुठीचा मी कुठे कैदी
प्रितीचा कवडसा आहे
प्रितीचा कवडसा आहे
- अनंत नांदुरकर - ख़लिश
No comments:
Post a Comment