प्रेमावरती हावी झाला...
संशय फार प्रभावी झाला..
संशय फार प्रभावी झाला..
ताज तिच्या मायेचा होता
राग तिचा धारावी झाला...
राग तिचा धारावी झाला...
तोंडाला मौनाचे टाळे...
एक शब्द मग चावी झाला...
एक शब्द मग चावी झाला...
तो सध्या कोणीही नाही...
मग सध्या तो भावी झाला...
मग सध्या तो भावी झाला...
शहरामध्ये जगते शिक्षा...
एक गुन्हा जर गावी झाला...
एक गुन्हा जर गावी झाला...
२.
माझ्यामधला कोण वेगळा...
ज्याचा दृष्टीकोन वेगळा...
ज्याचा दृष्टीकोन वेगळा...
गोल मनाशी जुळणे नाही...
बुद्धीचा षटकोन वेगळा...
बुद्धीचा षटकोन वेगळा...
द्रोण वेगळा जगतांनाचा...
मरतांनाचा द्रोण वेगळा...
मरतांनाचा द्रोण वेगळा...
नंबर सगळे त्याच्यापाशी...
यमराजाचा फोन वेगळा...
यमराजाचा फोन वेगळा...
राग तुझ्या रागाचा नव्हता...
पटला नव्हता टोन वेगळा...
पटला नव्हता टोन वेगळा...
३.
नभाएवढे पाय तुझे...
वामन रुप बोन्साय तुझे...
वामन रुप बोन्साय तुझे...
मांसाचा मेंदू माझा...
अन् दगडाचे पाय तुझे...
अन् दगडाचे पाय तुझे...
जिकडे तिकडे आहे तू...
नाही आहे काय तुझे...
नाही आहे काय तुझे...
गरज सरो अन् वैद्य मरो...
असेच झाले माय तुझे...
असेच झाले माय तुझे...
४.
सदैव जागी जुनी आठवण...
अजून ताजी जुनी आठवण...
अजून ताजी जुनी आठवण...
नवे शहारे लखलाभ तुला...
माझ्यासाठी.. जुनी आठवण...
माझ्यासाठी.. जुनी आठवण...
मुजोर होती तुझ्यासारखी....
दबली नाही जुनी आठवण...
दबली नाही जुनी आठवण...
आपण दोघे अबोल होतो...
अबोल नव्हती जुनी आठवण...
अबोल नव्हती जुनी आठवण...
नवीन क्षण बाळंतिण झाले...
झाली आजी जुनी आठवण...
झाली आजी जुनी आठवण...
उठल्या उठल्या भरली चावी...
चालू झाली जुनी आठवण...
चालू झाली जुनी आठवण...
तिला विसरले नाही दोघे...
किती अभागी जुनी आठवण...
किती अभागी जुनी आठवण...
५.
उदासवाणी म्हणते...
पण ती गाणी म्हणते...
पण ती गाणी म्हणते...
ओठ तिचे असतिल पण...
व्यथा कहाणी म्हणते...
व्यथा कहाणी म्हणते...
मी तर 'अश्रू' म्हणतो...
पण ती 'पाणी' म्हणते...
पण ती 'पाणी' म्हणते...
आरशात ती बघते...
मनात 'राणी' म्हणते...
मनात 'राणी' म्हणते...
"हातात काय अपुल्या.."
केविलवाणी म्हणते...
केविलवाणी म्हणते...
ईच्छेस बैल म्हणते...
मनास घाणी म्हणते...
मनास घाणी म्हणते...
- अमित वाघ
No comments:
Post a Comment