१.
धुंद झालोत बघ कोषात आपण
सांग येऊ कधी होशात आपण
बाप गेल्यावरी थंडावलो अन्
मानली धन्यता घोषात आपण
जाग आली पुन्हा मनुच्या स्मृतीला
आग लावू पुन्हा जोशात आपण
आपली वाटते सत्ता जरी ही
सर्व डोळ्यातल्या रोषात आपण
जर बदललीच ना ही व्यवस्था तर
मग युगाच्या असू दोषात आपण
No comments:
Post a Comment