विष्णु सोळंके : एक गझल



१.  
पावसाने असे रोज येऊ नये
आठवांचे उरी स्वप्न पेरू नये

जीवनाची कसी झिंगली ही घड़ी
आसवांनी मला नाव ठेवू नये

चिंब झाली धरा चिंब झाली मने
पाखरानी पुन्हा तार छेडु नये

येत जाणे तुझे पावसाचे परी
उंब-याने तरी ठेच देऊ नये

दुःख माझे तुझे एक झाले तरी  
जिव माझा कुणी हाय वेचु नये

- विष्णु सोळंके


No comments: