रामकृष्ण रोगे : एक गझल


१.
कुणाच्या पुढे वाकलो मी ?
असे वाटले संपलो मी

यमाचे सदा ध्यान करतो
अता फार कंटाळलो मी

कसे पावलांना समजले?
तिला भेटण्या चाललो मी

मला आजही याद आहे
तिच्यावर कसा भाळलो मी

म्हणे तो नका दंड देवू
चुकीने खरे बोललो मी

पुन्हा एक आधार गेला
पुन्हा एकदा हारलो मी

No comments: