ना कधी पाहिले गोकुळ मथुरा काशी
मी मलाच केले जमा तुझ्या पायाशी.!
मी मलाच केले जमा तुझ्या पायाशी.!
गोडवा किती लांबून चाखते आहे
ती नजर म्हणू की म्हणू तिला मधमाशी.!
ती नजर म्हणू की म्हणू तिला मधमाशी.!
मी जुळवत गेले काळजातले धागे
बांधून घेतला जन्म तुझ्या जन्माशी.!
बांधून घेतला जन्म तुझ्या जन्माशी.!
तू चाळ जरा इतिहास मागचा वेड्या
पडणार पुढेही गाठ तुझी माझ्याशी.!
पडणार पुढेही गाठ तुझी माझ्याशी.!
जर उरले नसते काही देणे घेणे
घुटमळले नसते रोज तुझ्या दाराशी.!
घुटमळले नसते रोज तुझ्या दाराशी.!
देशील मला तू लाख दुरावा दे ना..
मिळतील तुलाही आठवणींच्या राशी.!
मिळतील तुलाही आठवणींच्या राशी.!
२.
किती सांभाळते आहे जिवाच्या आत दरवाजा
तुझे काळीज घर माझे तुझ्या डोळ्यात दरवाजा.!
तुझे काळीज घर माझे तुझ्या डोळ्यात दरवाजा.!
कवडसा एकही येणार की नाही इथे आता
तुझ्या ताब्यामध्ये खिडक्या तुझ्या ताब्यात दरवाजा.!
तुझ्या ताब्यामध्ये खिडक्या तुझ्या ताब्यात दरवाजा.!
उभ्या जन्मात मुक्तीची कुठे मी पाहिली स्वप्ने
कुठे मी पाहिला होता उभ्या जन्मात दरवाजा.!
कुठे मी पाहिला होता उभ्या जन्मात दरवाजा.!
तसाही उंबरा येणार होता आड दोघांच्या
तसाही यायचा होता तुझ्यामाझ्यात दरवाजा.!
तसाही यायचा होता तुझ्यामाझ्यात दरवाजा.!
घराचा बाप होताना घराची माय होताना
उभा असतो मुलासाठी उन्हातान्हात दरवाजा.!
उभा असतो मुलासाठी उन्हातान्हात दरवाजा.!
भ्रमंती आजही सरली कुठे माझ्या नशीबाची
नसावा एकही माझ्याच मुक्कामात दरवाजा.!
नसावा एकही माझ्याच मुक्कामात दरवाजा.!
नको ठेवू कड्या कुलुपामध्ये कुठल्याच इच्छेला
असे सांगून गेला काल हे कानात दरवाजा.!
असे सांगून गेला काल हे कानात दरवाजा.!
३.
चूकही वाटते का बरोबर मला
काय झाले कळेना खरोखर मला.!
काय झाले कळेना खरोखर मला.!
मी कुठे मागते रात्र सारी तुझी..
ठेव सोबत तुझ्या तू दिवसभर मला.!
ठेव सोबत तुझ्या तू दिवसभर मला.!
काळजाची जरा काळजी वाटते..
त्यांस ताब्यात घे वा परत कर मला.!
त्यांस ताब्यात घे वा परत कर मला.!
या दुराव्यामुळे गारठा वाढतो
आज अंथर मला आज पांघर मला.!
आज अंथर मला आज पांघर मला.!
मी तशी तर तुझ्या अंतरी नांदते
काय देशील तू फार अंतर मला.!
ते दिसू लागते मग तुझ्यासारखे
रोज बोलावते जे सरोवर मला.!
रोज बोलावते जे सरोवर मला.!
तू नको ना मधे हात सोडू असा
मग भिती वाटते रे भयंकर मला.!
मग भिती वाटते रे भयंकर मला.!
फक्त मिसर्यात जर मी सुचू लागले
कर तुझ्या मैफिलीतून सादर मला.!
कर तुझ्या मैफिलीतून सादर मला.!
४.
किती सोसले चटके बघ गेले करपून तुझ्यासाठी
पदराखाली घेत राहिले दाहक ऊन तुझ्यासाठी.!
पदराखाली घेत राहिले दाहक ऊन तुझ्यासाठी.!
फक्त तुझ्या त्या करंगळीच्या आधारावर वेल्हाळा
संसाराचा गोवर्धन घेते उचलून..तुझ्यासाठी.!
संसाराचा गोवर्धन घेते उचलून..तुझ्यासाठी.!
जन्म मृत्यूच्या विळख्यामध्ये असा अडकतो मोह तुझा
झुरते.. सरते.. मरते.. पण येते परतून तुझ्यासाठी.!
झुरते.. सरते.. मरते.. पण येते परतून तुझ्यासाठी.!
देवुन देवुन असे तू तरी काय मला देणार म्हणा
म्हणून जपते घाव तुझे.. माझे समजून.. तुझ्यासाठी.!
म्हणून जपते घाव तुझे.. माझे समजून.. तुझ्यासाठी.!
ज्या स्वप्नाच्या इच्छेखातर तुला आपले केले मी
त्या इच्छेचा हजारदा मग करते खून तुझ्यासाठी.!
त्या इच्छेचा हजारदा मग करते खून तुझ्यासाठी.!
नको वेगळे कारण ये ना माझ्यासाठी कधीतरी
किंवा घे ना मलाच तेथे बोलावून तुझ्यासाठी.!
किंवा घे ना मलाच तेथे बोलावून तुझ्यासाठी.!
सहा ऋतूंना उधळत सरले जरी आजवर जन्म सहा
ऋतू सातवा ठेवत आहे सांभाळून तुझ्यासाठी.!
ऋतू सातवा ठेवत आहे सांभाळून तुझ्यासाठी.!
(साडी नेसुन आले म्हणजे काय वेगळे केले पण..
रंग गुलाबी आज निवडला मी ठरवून तुझ्यासाठी.!)
रंग गुलाबी आज निवडला मी ठरवून तुझ्यासाठी.!)
५.
सावल्यांनी एवढे थबकून बघण्यासारखे
हे बघा आहेच माझे ऊन बघण्यासारखे.!
हे बघा आहेच माझे ऊन बघण्यासारखे.!
बंद खिडकीचीच तू केलीस का पारायणे
एक होते दारही ढकलून बघण्यासारखे.!
एक होते दारही ढकलून बघण्यासारखे.!
रंगरंगोटी घराची एवढी केलीस की
राहिले ना ते पुन्हा आतून बघण्यासारखे.!
राहिले ना ते पुन्हा आतून बघण्यासारखे.!
फाटल्या पानामुळे तर हे कळाले शेवटी
नाव ते नव्हते मुळी खोडून बघण्यासारखे.!
नाव ते नव्हते मुळी खोडून बघण्यासारखे.!
तू नको पाहूस ते जमणारही नाही तुला
एक होते स्वप्न सांभाळून बघण्यासारखे.!
एक होते स्वप्न सांभाळून बघण्यासारखे.!
आजही बघ बोललो नाहीच ना आपण पुन्हा
आजही होते विषय बोलून बघण्यासारखे.!
आजही होते विषय बोलून बघण्यासारखे.!
या ठिकाणाहून साक्षात्कार झाला मग मला
काय आहे याच कोनातून बघण्यासारखे.!
काय आहे याच कोनातून बघण्यासारखे.!
भोवती आता तसेही शेकडो आहेेेत पण
चेहरे उरले कुठे निरखून बघण्यासारखे.!
चेहरे उरले कुठे निरखून बघण्यासारखे.!
- ममता सिंधुताई सपकाळ
No comments:
Post a Comment