रघुनाथ पोवार : एक गझल



१.
होत असतो नेहमी नापास मी
पण खरडतो तोच तो अभ्यास मी

चाळ पायी बांधले माझ्या तिने
ताल धरते जिंदगी पदन्यास मी

शास्वताचे गीत होते गायचे
राहिलो केवळ इथे आभास मी

जाहले उध्वस्त घर शाकारतो
चाललो परतून त्या गावास मी

काळजाचा डोह गहिवरता जरा
दे दिलासा बोललो काठास मी

- रघुनाथ बा पोवार

No comments: