मान्य आहे दार नाही लावलेले पण
ये म्हणत नाहीस तू,मग काय समजावे
ये म्हणत नाहीस तू,मग काय समजावे
घट्ट इतकेही नसावे कोणते नाते
श्वासही घेताक्षणी काळीज उसवावे
बोल माळ्याला नये लावू उन्हापोटी
रोपट्याने फक्त बिनबोभाट करपावे
रोपट्याने फक्त बिनबोभाट करपावे
हाक द्यावी फार तर दोस्तास दुसऱ्यांदा
शल्य त्यानंतर स्वतःच्या आत मुरवावे
शल्य त्यानंतर स्वतःच्या आत मुरवावे
एवढाही खास तू नाहीस आयुष्या
की तुझ्या वाटेत आम्ही जन्म पसरावे
की तुझ्या वाटेत आम्ही जन्म पसरावे
शाश्वती कोठे मिठी निरपेक्ष मिळण्याची
शक्यतो आपण स्वतःला घट्ट बिलगावे
शक्यतो आपण स्वतःला घट्ट बिलगावे
२.
दूर अज्ञातात पाझरते गझल
चल तहानेची तुझ्या पाहू मजल
दूर अज्ञातात पाझरते गझल
चल तहानेची तुझ्या पाहू मजल
डाव अर्धा टाकतो आहे कुठे
फक्त बाजूंची करू अदलाबदल
फक्त बाजूंची करू अदलाबदल
भार का माझ्याच माथी जीवना
यापुढे तू आपला वाटा उचल
यापुढे तू आपला वाटा उचल
मोगऱ्याची आसवे असतील ती
दव कुठे असते कधी इतके तरल
दव कुठे असते कधी इतके तरल
का इथे आलो मला कळले कुठे
जन्म मी समजू कसा माझा सफल
जन्म मी समजू कसा माझा सफल
टाळली नजरानजर जेव्हा तिने
घेतली होती तिने माझी दखल
घेतली होती तिने माझी दखल
मी नकोसे प्रश्न नाही टाळले
उत्तरादाखल दिली त्यांना बगल
उत्तरादाखल दिली त्यांना बगल
३.
आजवर दिसले न काही या प्रकारासारखे
ओठ ये म्हणतात, डोळे बंद दारासारखे
आजवर दिसले न काही या प्रकारासारखे
ओठ ये म्हणतात, डोळे बंद दारासारखे
स्पर्श ओझरता तुझा अन श्वास माझा थांबतो
मग तुझे ते पाहणे प्रथमोपचारासारखे
मग तुझे ते पाहणे प्रथमोपचारासारखे
हो, नजर थकली जराशी, हो, जरा दम घेउदे
हो, तुझे लावण्य आहे चढउतारासारखे
हो, तुझे लावण्य आहे चढउतारासारखे
मी खुशीने मालकी माझी दिली आहे तुला
पण मिळावे वाटते काही पगारासारखे
पण मिळावे वाटते काही पगारासारखे
रोज एका तारखेचा आकडा मी लावतो
श्वास घेणे सोडणे निव्वळ जुगारासारखे
श्वास घेणे सोडणे निव्वळ जुगारासारखे
मारतो इतक्या सहज वेळीअवेळी तो मिठी
वाग ना तूही तुझ्या भोळ्या विचारासारखे
वाग ना तूही तुझ्या भोळ्या विचारासारखे
चांगले येतिल दिवस अन मी तुझी होईनही
बोलणे असते तुझे तद्दन प्रचारासारखे
बोलणे असते तुझे तद्दन प्रचारासारखे
टाळते आहेस गझले तू विनाकारण मला
काफियाने टाळलेल्या त्या अकारासारखे
काफियाने टाळलेल्या त्या अकारासारखे
४.
हसवेनही कदाचित फसवेनही कदाचित
समजून घ्याल तर मी समजेनही कदाचित
हसवेनही कदाचित फसवेनही कदाचित
समजून घ्याल तर मी समजेनही कदाचित
परतून आत माझ्या आलो खरा पुन्हा मी
जाईनही लगोलग, थांबेनही कदाचित
जाईनही लगोलग, थांबेनही कदाचित
केलाच हट्ट जर का निष्पाप वेदनेने
माझी तुझी कहाणी सांगेनही कदाचित
माझी तुझी कहाणी सांगेनही कदाचित
नुकतीच मूठमाती आहे दिली मनाला
आता रुजेन बहुधा, उगवेनही कदाचित
आता रुजेन बहुधा, उगवेनही कदाचित
निर्ढावलो कधी जर, माझ्या अजाण कविते
छापेनही तुला मी, मिरवेनही कदाचित
छापेनही तुला मी, मिरवेनही कदाचित
५.
हल्ली कमीपण वाटते माझे कवीपण
मग का जपावे फक्त नावाचे कवीपण
हल्ली कमीपण वाटते माझे कवीपण
मग का जपावे फक्त नावाचे कवीपण
तू बोल, तू आक्रोश कर, तू दे शिव्याही
पण व्यक्त हो, इतक्याच कामाचे कवीपण
पण व्यक्त हो, इतक्याच कामाचे कवीपण
छापील ओळींनी कुठे का सिद्ध होते
रक्तातल्या अस्वस्थ थेंबाचे कवीपण
रक्तातल्या अस्वस्थ थेंबाचे कवीपण
होईन दुनियादार, पुटपुटतो स्वताशी
अन हासते कुत्सित जरा त्याचे कवीपण
अन हासते कुत्सित जरा त्याचे कवीपण
वेडेपणा त्याचा जरा विसरून जा रे
समजून घ्या जमल्यास वेड्याचे कवीपण
समजून घ्या जमल्यास वेड्याचे कवीपण
- सदानंद बेंद्रे
No comments:
Post a Comment