रोशनकुमार शामजी पिलेवान : एक गझल


१. 
विरोधकांनी कावा केला
अन् उजव्याचा डावा केला

पाय चाटतो,लाळ घोटतो
गुलाम अवघा  छावा केला

ऐकलीस ना हाक माधवा
तिने कालही धावा केला

व्यथीत झाली व्यथा अखेरी
उगाच हा कांगावा केला

सौख्य दिले मी आणि जगाने
दुःखाचा परतावा केला

ही खाण्याची चीज खरेतर
का गाजरचा  पावा केला?

माणुसकीला घडवायाला 
कुंभाराचा आवा केला

"नको वाटणी ,नाथा "म्हणुनी
हृदयावरती दावा केला

रोशनकुमार शामजी पिलेवान 
मु.पो. पिंपळगाव भोसले
ता. ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर  441206
7798509816 



No comments: