कुठे कुणाची सोबत पुरते आयुष्याला
एकाकीपण कायम सलते आयुष्याला
एकाकीपण कायम सलते आयुष्याला
ज्या वळणावर हात तुझाही सुटला होता
त्या वाटेची भिती वाटते आयुष्याला
त्या वाटेची भिती वाटते आयुष्याला
कामे टाकुन ये म्हणते तू अर्ध्यावरती
कोण अवेळी हाक मारते आयुष्याला?
कोण अवेळी हाक मारते आयुष्याला?
तळपायाच्या भेगा,तळहाताचे घट्टे
फक्त एवढे मागे उरते,आयुष्याला
फक्त एवढे मागे उरते,आयुष्याला
या डोळ्यांनी इतका पाउस साठवला की,
आता अंधुक अंधुक दिसते आयुष्याला
आता अंधुक अंधुक दिसते आयुष्याला
आहे,नाही च्या झोक्यावर झुलते आहे
अस्तित्वाची शंका छळते आयुष्याला
अस्तित्वाची शंका छळते आयुष्याला
कोणी वापरते, ठोकरते ,पाठ फिरवते
घाव कुणी देते भळभळते आयुष्याला
घाव कुणी देते भळभळते आयुष्याला
आयुष्यावर बोलू शकते आहे कारण
मी नेमाने वाचत असते आयुष्याला
मी नेमाने वाचत असते आयुष्याला
२ .
अगोदर लायकीही काढता माझी
पुन्हा माफी कशाला मागता माझी
पुन्हा माफी कशाला मागता माझी
तुझ्यापासून जर सुरुवात आहे तर
तुझ्या हातून व्हावी सांगता माझी
तुझ्या हातून व्हावी सांगता माझी
बरे वाईट ते आता कसे सांगू
कधी तू घेतली का मान्यता माझी?
कधी तू घेतली का मान्यता माझी?
उभे राहून म्हणते सत्य बाजारी
चला, बोली कितीला लावता माझी?
चला, बोली कितीला लावता माझी?
किती हा गलबला येतो विचारांचा
मला बोलून गेली शांतता माझी
मला बोलून गेली शांतता माझी
पहा आपापली खोली किती आहे
उगा पाळेमुळे का शोधता माझी?
उगा पाळेमुळे का शोधता माझी?
हरवली वाटते गर्दीत झेंड्यांच्या
मला आणून द्या एकात्मता माझी
मला आणून द्या एकात्मता माझी
खुजेपण आपले पडताळण्यासाठी
तुम्ही उंची कितीदा मोजता माझी ?
तुम्ही उंची कितीदा मोजता माझी ?
स्वतःचा राखला सन्मान थोडासा
जगाला वाटली ती आढ्यता माझी
जगाला वाटली ती आढ्यता माझी
३.
हृदयामध्ये रुतले भाले ,हरकत नाही
असे रेशमी घाव मिळाले ,हरकत नाही
असे रेशमी घाव मिळाले ,हरकत नाही
घोट सुखाचा मागितला होता एखादा
दुःखाने तू भरले प्याले ,हरकत नाही
दुःखाने तू भरले प्याले ,हरकत नाही
मौज मजेला धावत आले सगे सोबती
कठीणवेळी दूर पळाले, हरकत नाही
कठीणवेळी दूर पळाले, हरकत नाही
माणुसकीची करू पेरणी इथे, लोकहो
पीक मोजके जरी निघाले ,हरकत नाही
पीक मोजके जरी निघाले ,हरकत नाही
मी केव्हाही सामिल नव्हते डावामध्ये
तरी जुगारी लोक म्हणाले, हरकत नाही
तरी जुगारी लोक म्हणाले, हरकत नाही
अमुची श्रद्धा पाषाणीही देव शोधते
तुझे रूप उशिराच कळाले ,हरकत नाही
तुझे रूप उशिराच कळाले ,हरकत नाही
मला आपले म्हणून त्याने जवळ करावे
मग विरहाने किती जळाले, हरकत नाही
मग विरहाने किती जळाले, हरकत नाही
फुले झेलण्यासाठी धरली ओंजळ तेव्हा
पुन्हा निखारे हाती आले ,हरकत नाही
पुन्हा निखारे हाती आले ,हरकत नाही
४.
भार जरासा हलका केला
घट डोईचा तिरका केला
घट डोईचा तिरका केला
हळूच त्याचा हात सोडला
जीव जिवातुन परका केला
जीव जिवातुन परका केला
आधी फोडत बसले,नंतर
गोळा टवका, टवका केला
गोळा टवका, टवका केला
लक्ष वेधण्यासाठी त्याचे
राग उगाचच लटका केला
राग उगाचच लटका केला
अश्रू आले पाणवठ्यावर
गर्दी झाली ,गलका केला
गर्दी झाली ,गलका केला
कुणी जाळली मिरची येथे?
कुणी एवढा ठसका केला?
चिमटा नव्हते काढत मी तर
विनोद हलका-फुलका केला
विनोद हलका-फुलका केला
प्रेमावर विश्वास ठेवते
द्वेष जरी तू इतका केला
द्वेष जरी तू इतका केला
अशी फाळणी केली त्यांनी
घाव घातला, कुटका केला
घाव घातला, कुटका केला
सुख कोणाचे पुन्हा टोचले ?
असा चेहरा रडका केला
असा चेहरा रडका केला
तू पिल्लांना दिलीस छाया
सहन उन्हाचा चटका केला
सहन उन्हाचा चटका केला
उंचीवर नेले इतके की
त्याचा क्षुल्लक ठिपका केला
त्याचा क्षुल्लक ठिपका केला
५.
ऐकून घ्यायलाही त्याला उसंत नाही
की हाक पोचलेली त्याच्यापर्यंत नाही?
की हाक पोचलेली त्याच्यापर्यंत नाही?
हुंड्यावरून कोणी बाजार मांडला तर
बिनधास्त सांग पोरी मुलगा पसंत नाही
बिनधास्त सांग पोरी मुलगा पसंत नाही
नावास जीवनाचा जोडू नका पुरावा
मी श्वास घेत आहे म्हणजे जिवंत नाही
मी श्वास घेत आहे म्हणजे जिवंत नाही
डोळ्यात आसवांचा साठा करून ठेवा
याहून कोणताही मुद्दा ज्वलंत नाही
याहून कोणताही मुद्दा ज्वलंत नाही
ती वारसा जगाला सांगेन वादळाचा
केव्हाच हारलेली आत्तापर्यंत नाही
केव्हाच हारलेली आत्तापर्यंत नाही
का ओंजळी फुलांच्या मागेल तो ऋतुंना ?
लाचार एवढाही माझा वसंत नाही
लाचार एवढाही माझा वसंत नाही
ही कैद मान्य केली बंदिस्त पापण्यांची
तेथेच संपले तर करणार खंत नाही
तेथेच संपले तर करणार खंत नाही
सारेच राजरस्ते वळले तुझ्याकडे पण
कुठलीच वाट आली माझ्यापर्यंत नाही
कुठलीच वाट आली माझ्यापर्यंत नाही
- अल्पना देशमुख नायक
No comments:
Post a Comment