१.
मी नकोसा घेतला निर्णय पुन्हा
आडवे आले जगाचे भय पुन्हा
आडवे आले जगाचे भय पुन्हा
खून नात्याचा असा झाला कसा
संशयावर वाढला संशय पुन्हा
संशयावर वाढला संशय पुन्हा
जे जसे आहे तसे स्वीकारले
मी मला केले असे निर्भय पुन्हा
मी मला केले असे निर्भय पुन्हा
घेतला हातात माझा हात तू
जीवनाला भेटला आशय पुन्हा
जीवनाला भेटला आशय पुन्हा
भेटता आलेच नाही शेवटी
भोवली माझी मला हयगय पुन्हा
भोवली माझी मला हयगय पुन्हा
२.
शोध तुझे तू नवीन रस्ते विषय संपला
मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला
मला पाहिजे तसे जगू दे विषय संपला
कोकीळेसही भुरळ पडावी तुझ्या गळ्याने
माझे असु दे बेसूर गाणे विषय संपला
माझे असु दे बेसूर गाणे विषय संपला
पत्र गुलाबी प्रेमाने पाठवा परंतू
उत्तर जर का नाही आले विषय संपला
उत्तर जर का नाही आले विषय संपला
छान तुझा संसार चालला ; कमी कशाची ?
तिच्या घरी ती मजेत आहे विषय संपला
तिच्या घरी ती मजेत आहे विषय संपला
रात्री अपरात्रीला येते फुटून दुखणे
रोज सकाळी जरी वाटते विषय संपला
रोज सकाळी जरी वाटते विषय संपला
त्रुटीत होती अडकुन फाइल महिनोमहिने
फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला
फक्त जरासे वजन ठेवले विषय संपला
वजीर गेला हत्ती घोडे प्यादे मेले
नंतर एका चेकमेटने विषय संपला
नंतर एका चेकमेटने विषय संपला
३.
नसू दे झाड एखादे, इथे अंगण कुठे आहे?
तुझ्या या वेल फर्नीशड् फ्लॅटला घरपण कुठे आहे?
तुझ्या या वेल फर्नीशड् फ्लॅटला घरपण कुठे आहे?
उभारा उंच भिंती माणसांमध्ये चिरेबंदी,
हवेला रोखता यावे असे कुंपण कुठे आहे?
हवेला रोखता यावे असे कुंपण कुठे आहे?
विषय येतो नकोसा अन् पुन्हा होते सुरू भांडण
जरा समजून घे की नेमकी अडचण कुठे आहे?
जरा समजून घे की नेमकी अडचण कुठे आहे?
जिवावर बेतला होता जरीही घाव लढताना
अता मी दाखवत असतो खुशीने, व्रण कुठे आहे?
अता मी दाखवत असतो खुशीने, व्रण कुठे आहे?
निघावी स्वच्छ ज्याने माणसांची जात कायमची;
जरा सांगा तुकारामा असा साबण कुठे आहे?
जरा सांगा तुकारामा असा साबण कुठे आहे?
सिमेंटी जंगलांच्या आड लपल्या तारका सगळ्या..
चिमुकल्यांचे अता शहरात तारांगण कुठे आहे?
चिमुकल्यांचे अता शहरात तारांगण कुठे आहे?
४.
ठेवला खड्डा असा हा उथळ कोणी
मार्ग आहे काढला मग सरळ कोणी
मार्ग आहे काढला मग सरळ कोणी
ओढले यात्रेत होते जवळ कोणी
पाडली पोरीस आहे भुरळ कोणी
पाडली पोरीस आहे भुरळ कोणी
थांबली होती कधीची भूक दारी
वाढला मग एक तुकडा सढळ कोणी
वाढला मग एक तुकडा सढळ कोणी
खोलवर होते तिथे निर्माल्य कुजले
थांबले नाही नदीच्या जवळ कोणी
थांबले नाही नदीच्या जवळ कोणी
तापले वातावरण भट्टी प्रमाणे
ओकतो आहे हवेवर गरळ कोणी
ओकतो आहे हवेवर गरळ कोणी
ती झऱ्याचा चेहरा लावून आली
पाहिले आहे असे का नितळ कोणी
पाहिले आहे असे का नितळ कोणी
राहिली मागे खुन्याची सावली की
ठेवला आहे पुरावा सबळ कोणी?
ठेवला आहे पुरावा सबळ कोणी?
आतल्या भिंती किती भेगाळलेल्या
मारली आहे मनावर कुदळ कोणी
मारली आहे मनावर कुदळ कोणी
चित्र आले वेगळे डोळ्यांपुढे की
घातले डोळ्यात आहे कुसळ कोणी
घातले डोळ्यात आहे कुसळ कोणी
- अमोल शिरसाट
No comments:
Post a Comment