बसवून मैफलीला देतील शाल बहुधा
टाळीविना परंतू करतील हाल बहुधा
टाळीविना परंतू करतील हाल बहुधा
उपसून कष्ट नुसते श्रीमंत कोण होते
हा लाखमोल अजुनी आहे सवाल बहुधा
हा लाखमोल अजुनी आहे सवाल बहुधा
कित्येक काळज्या अन सोबत जबाबदाऱ्या
वाहून रोज ओझे झालो हमाल बहुधा
वाहून रोज ओझे झालो हमाल बहुधा
ते सत्यमेव जयते गेले कुठे कळेना
स्वार्थापुढे कदाचित ,झाले हलाल बहुधा
स्वार्थापुढे कदाचित ,झाले हलाल बहुधा
दरसाल आसवांची घेतोस तू दलाली
झालास पावसा तू पक्का दलाल बहुधा
झालास पावसा तू पक्का दलाल बहुधा
इतके कुठून आले रस्त्यात खाच खळगे
तत्वानुसार केली मी वाटचाल बहुधा
तत्वानुसार केली मी वाटचाल बहुधा
वाटे नको नको जे वाट्यास येत आहे
करतोस तूच दैवा हा गोलमाल बहुधा
करतोस तूच दैवा हा गोलमाल बहुधा
२.
घेते अशी परीक्षा अंदाज येत नाही
नियती कधी कुणाला पर्याय देत नाही
नियती कधी कुणाला पर्याय देत नाही
सारे तुझेच आहे म्हणतो असे जरीही
कोणी कुणास येथे सर्वस्व देत नाही
कोणी कुणास येथे सर्वस्व देत नाही
नसणार भ्रष्ट नक्की ईश्वर अजून सुद्धा
कोणाकडून कसली तो लाच घेत नाही
कोणाकडून कसली तो लाच घेत नाही
पैसा जमीन पाणी वाटून सर्व झाले
अद्याप आखलेली सीमा हवेत नाही
अद्याप आखलेली सीमा हवेत नाही
मारून तू भराऱ्या केले कवेत अंबर
अजुनी तुझ्या मनाला केले कवेत नाही
अजुनी तुझ्या मनाला केले कवेत नाही
जमल्यास साजरे कर हातातल्या क्षणांना
मृत्यू कुणास येथे सांगून येत नाही
मृत्यू कुणास येथे सांगून येत नाही
३.
एक कप्पा जाणिवांचा आतला बुजला असावा
स्वार्थ का रक्तात अपुल्या एवढा भिनला असावा
स्वार्थ का रक्तात अपुल्या एवढा भिनला असावा
पेटती राहो न राहो ज्योत नंतर बघ पुढे ही
तेव आता तू स्वतः बहुधा दिवा म्हटला असावा
तेव आता तू स्वतः बहुधा दिवा म्हटला असावा
सिंह होता जो कधी पाळीव कुत्रा होत गेला
फेकलेला रोज तुकडा आयता गिळला असावा
फेकलेला रोज तुकडा आयता गिळला असावा
बहरली नाहीत नाती हाय! जोपासून सुद्धा
कोंब हळव्या जाणिवांचा त्यातला खुडला असावा
कोंब हळव्या जाणिवांचा त्यातला खुडला असावा
उमटली नाही कशी कळ चेहऱ्यावर वेदनेची
एवढ्यादुःखात ही मिसरा नवा सुचला असावा
एवढ्यादुःखात ही मिसरा नवा सुचला असावा
धावते आहे अशी गर्दीत वारंवार दृष्टी
ओळखीचा चेहरा नजरेस ह्या दिसला असावा
ओळखीचा चेहरा नजरेस ह्या दिसला असावा
पाठबळ का देत गेले गैर कृत्ये पाहताना
आतला आवाज त्यांनी खोल बघ पुरला असावा
आतला आवाज त्यांनी खोल बघ पुरला असावा
गिरवतो आहे पुन्हा संस्कार आधीच्या पिढीचे
लाभलेला वारसा नक्कीच बघ पुसला असावा
लाभलेला वारसा नक्कीच बघ पुसला असावा
प्यायले फुंकून नंतर ताक ताटातील त्यांनी
लागल्या असणार ठेचा भरवसा टिचला असावा
लागल्या असणार ठेचा भरवसा टिचला असावा
पोकळी दिसली अचानक वाढलेली ही कशाने
एक ह्या गर्दीत ला तारा पुन्हा तुटला असावा
.
एक ह्या गर्दीत ला तारा पुन्हा तुटला असावा
.
४.
जरी उल्लेख तू माझा खुबीने टाळला होता
सुगावा मैफलीला ह्या तरीही लागला होता
सुगावा मैफलीला ह्या तरीही लागला होता
वितळला देह देहावर ,दिव्याने झाकले डोळे
शहण्यासारखा तेंव्हा दिवाही वागला होता
शहण्यासारखा तेंव्हा दिवाही वागला होता
वडाची तोडली नाही कधी फांदी पुजेसाठी
जुना उपचार वरवरचा तिने फेटाळला होता
जुना उपचार वरवरचा तिने फेटाळला होता
कुठे मग घेतली नाही दखलही एकमेकांची
दुरावा एवढा दोघातला विस्तारला होता
दुरावा एवढा दोघातला विस्तारला होता
कधीही यायचो नाही पुन्हा परतून मी आता
जुना तो काळ जाताना असे उद्गारला होता
जुना तो काळ जाताना असे उद्गारला होता
कळाली फार उशिराने गरज संस्कार जपण्याची
पुन्हाजोपासतो आहे वसा जो लाभला होता
पुन्हाजोपासतो आहे वसा जो लाभला होता
मिळाले देवपण कोठे सहज देवास ही येथे
दिलेला घाव त्यानेही खुशीने सोसला होता
- जयश्री कुळकर्णी
दिलेला घाव त्यानेही खुशीने सोसला होता
- जयश्री कुळकर्णी
No comments:
Post a Comment