१.
भरल्या नदीत ना बुडणारी घागर पाहू
नंतर चोरुन 'खिर' खाणारे मांजर पाहू
नंतर चोरुन 'खिर' खाणारे मांजर पाहू
बघू वेदने किती कुणाचा संयम आधी
हार तुझी की माझी होते नंतर पाहू
हार तुझी की माझी होते नंतर पाहू
मुळीच नाही शंका माझ्या कर्तृत्वावर
कशास माझी किती व्यापते चादर पाहू
आयुष्याने मुळावरी संस्कार ओतले
परिणामांचा बहर पुढे फांद्यांवर पाहू
परिणामांचा बहर पुढे फांद्यांवर पाहू
चौथे आसन फारच धोकादायक दिसते
लटकत जाउन लोकलच्या दारावर पाहू
लटकत जाउन लोकलच्या दारावर पाहू
नको दाखवू बोट घालुनी सदरा माझा
तुझा स्वतःचा पदर अगोदर सावर पाहू
तुझा स्वतःचा पदर अगोदर सावर पाहू
लेकीसाठी मोठ्या घरचे स्थळ आल्यावर
आधी भाकर, नंतर नोकर चाकर पाहू
आधी भाकर, नंतर नोकर चाकर पाहू
२.
ठेवली आहे मनाच्या आत प्रेमाने
माणसे सांभाळणारी जात प्रेमाने
माणसे सांभाळणारी जात प्रेमाने
जेवढा करशील माझा द्वेष हृदयातुन
तेवढा राहिल तुझ्या लक्षात प्रेमाने
तेवढा राहिल तुझ्या लक्षात प्रेमाने
वाजते आहे हृदय माझे जणू पैंजण
बांधले आहे तिच्या पायात प्रेमाने
बांधले आहे तिच्या पायात प्रेमाने
जेवढी बोली जगाच्या भावनांवरती
मी निघालो तेवढा स्वस्तात प्रेमाने
मी निघालो तेवढा स्वस्तात प्रेमाने
पावले जितकी तिच्या रस्त्याकडे गेली
आणले तितके मला रस्त्यात प्रेमाने
आणले तितके मला रस्त्यात प्रेमाने
रंगली नाही तिच्या हातावरी मेंदी
ठेवला होता कलर धोक्यात प्रेमाने
ठेवला होता कलर धोक्यात प्रेमाने
हरवली होती तरलता चेहऱ्यावरची
पाहिले नव्हते कधी पाण्यात प्रेमाने
पाहिले नव्हते कधी पाण्यात प्रेमाने
थांबलो नाही पुन्हा कुठल्याच टप्प्यावर
फेकले होते मला प्रेमात प्रेमाने
फेकले होते मला प्रेमात प्रेमाने
३.
असे संस्कार ओझ्याचे कुणी केलेत वेलीवर
तिच्या नाजूक पाठीवर फुलांचे लादुनी दप्तर
तिच्या नाजूक पाठीवर फुलांचे लादुनी दप्तर
खडे टाकून श्वासांचे जिवाला काढतो वरवर
मनाचा कावळा होतो दुरावा खोल गेल्यावर
मनाचा कावळा होतो दुरावा खोल गेल्यावर
विकाया काढली आहेस माती, बालपन, नाती
कसे विसरून गेला रे जिथे खेळायचो घरघर
कसे विसरून गेला रे जिथे खेळायचो घरघर
नभाची फाटते छाती नदीचा आटतो पान्हा
निसर्गाला सुतक येते बळी कर्जात मेल्यावर
निसर्गाला सुतक येते बळी कर्जात मेल्यावर
असा सुचलाय मिसरा ज्यात आले मर्म रात्रींचे
कुणाचे कोरडे अंगण कुणाच्या चांदण्या घरभर
कुणाचे कोरडे अंगण कुणाच्या चांदण्या घरभर
उडाली एक चिमणी घेउनी तुकडा फुटाण्याचा
पुढे आयुष्य सावरले तिने त्या एक तुकड्यावर
पुढे आयुष्य सावरले तिने त्या एक तुकड्यावर
तुला जे जे हवे ते कर तुझे आयुष्य आहे, पण
नको वृद्धाश्रमावची वेळ आणू माय बापावर
नको वृद्धाश्रमावची वेळ आणू माय बापावर
४.
एक धागा अंतरी सांभाळ दोघांचा
संशयाची एक ठिणगी काळ दोघांचा
विस्तवाशी ठेवली जर प्रीत दोघांनी
तर पुढे होणार नक्की जाळ दोघांचा
तर पुढे होणार नक्की जाळ दोघांचा
ठेव वेडे पाय कोण्या एक दगडावर
जीवघेणा खेळ खोटा टाळ दोघांचा
जीवघेणा खेळ खोटा टाळ दोघांचा
ती निघुन गेली ऋतू घेऊन वळवाचा
पोसतो भेगाळ मी दुष्काळ दोघांचा
पोसतो भेगाळ मी दुष्काळ दोघांचा
प्रीत आेसरली सुखाच्या पांगल्या लाटा
राहिला मागे किनारी गाळ दोघांचा
राहिला मागे किनारी गाळ दोघांचा
ती नजर चुकवून येते वर्तमानाची
शोधते बागेत मग भुतकाळ दोघांचा
शोधते बागेत मग भुतकाळ दोघांचा
५.
डायरी रक्ताळ आहे, 'का तुझी'?
लेखणी घायाळ आहे का तुझी
ठोस आहे गूढ आहे खोलही
शायरी पाताळ आहे का तुझी
शायरी पाताळ आहे का तुझी
वाळली बघ केतकी जाई जुई
बावडी भेगाळ आहे का तुझी
बावडी भेगाळ आहे का तुझी
का कथा काव्यात नाही मावली
बातमी दुष्काळ आहे का तुझी
बातमी दुष्काळ आहे का तुझी
ठेवते सारे ऋतू पोटी तिच्या
पापणी आभाळ आहे का तुझी
पापणी आभाळ आहे का तुझी
नेहमी असते तुझ्या मानेवरी
काळजी वेताळ आहे का तुझी
काळजी वेताळ आहे का तुझी
पाहती का लोक इर्षेने तुला
भाकरी डागाळ आहे का तुझी
भाकरी डागाळ आहे का तुझी
No comments:
Post a Comment