१.
केवढा झाला बदल माझ्यामधे
बघ तुला जमल्यास...चल माझ्यामधे
केवढा झाला बदल माझ्यामधे
बघ तुला जमल्यास...चल माझ्यामधे
हा असा पाऊस आणिक आठवण
वाढवत आहे चिखल माझ्यामधे
वाढवत आहे चिखल माझ्यामधे
वाढला आहे चिखल माझ्यामधे
शक्य असले तर उमल माझ्यामधे
शक्य असले तर उमल माझ्यामधे
मी तुला वैतागलो ..नंतर मला
मीच केले बेदखल माझ्यामधे
मीच केले बेदखल माझ्यामधे
मी कसा आहे मला सांगायला
काढ एखादी सहल माझ्यामधे
काढ एखादी सहल माझ्यामधे
ही तुझी इच्छा उचल माझ्यातली
विकल झाले आत्मबल माझ्यामधे
विकल झाले आत्मबल माझ्यामधे
सर्व प्रश्नांचा उगम माझ्यामुळे
सर्व प्रश्नांची उकल माझ्यामधे
सर्व प्रश्नांची उकल माझ्यामधे
२.
वाटत आहे का चालत आहे मी
मला ढकलते आहे इथली गर्दी
वाटत आहे का चालत आहे मी
मला ढकलते आहे इथली गर्दी
धुके पांघरुन शहर झोपले आहे
खूप वाढली आहे बहुधा थंडी
खूप वाढली आहे बहुधा थंडी
एक उदासी भेटायाला आली
मी बोलत बसलो होतो माझ्याशी
मी बोलत बसलो होतो माझ्याशी
त्रास तुला व्हायला नको माझ्यागत
तुला आठवण येऊ नये स्वतःची
तुला आठवण येऊ नये स्वतःची
सूर्य उगवला गेलेल्या दिवसांचा
बाकी काही नाही झोप उडवली
बाकी काही नाही झोप उडवली
वेळ बरा गेला होता रचताना
नंतर मग इमल्याची माती झाली
नंतर मग इमल्याची माती झाली
तेच तुझ्याही बुबुळांसमोर पाणी
आपण एका नावेतील प्रवासी
आपण एका नावेतील प्रवासी
३.
तुझा माझ्यात काही काळ गेला
पुन्हा येणार नाही काळ गेला
तुझा माझ्यात काही काळ गेला
पुन्हा येणार नाही काळ गेला
मला जे शक्य नव्हते शक्य झाले
तुझा माझ्याविनाही काळ गेला
तुझा माझ्याविनाही काळ गेला
सरावाची गरज असतेच कायम
सरावानेच हा ही काळ गेला
सरावानेच हा ही काळ गेला
मला आली मजा ऐकून तडतड
तुझी करण्यात लाही काळ गेला
तुझी करण्यात लाही काळ गेला
तुझ्या सोबत मला जो भेटलेला
कधी ? कळलेच नाही.. काळ गेला?
कधी ? कळलेच नाही.. काळ गेला?
क्षणांचा गाळ ही जाणार आहे
जसा मागे प्रवाही काळ गेला
जसा मागे प्रवाही काळ गेला
नशिब होते बरे की काय होते
पुन्हा दुमडून बाही काळ गेला
पुन्हा दुमडून बाही काळ गेला
कवडसे टेकुनी भिंतीस बसले
बघत शून्यात काही काळ गेला
बघत शून्यात काही काळ गेला
४.
नाद जर असलाच जगण्याचा
आपल्या तालावरी नाचा
नाद जर असलाच जगण्याचा
आपल्या तालावरी नाचा
बनवतो आहे नवा साचा
कारखाना काळ नावाचा
कारखाना काळ नावाचा
एक होता काळ त्या काळी
देव होता फार कामाचा
देव होता फार कामाचा
एक सल्ला आणला आहे
बघ तुझ्या असल्यास कामाचा
बघ तुझ्या असल्यास कामाचा
वाट मळलेेेली किती होती
केवढ्या मी घासल्या टाचा
केवढ्या मी घासल्या टाचा
लागली आहे कुठे तंद्री
आरसा बघतोय केंव्हाचा
आरसा बघतोय केंव्हाचा
मी तुझ्या आलो मनामध्ये
भाग नव्हता ह्यात डोक्याचा
भाग नव्हता ह्यात डोक्याचा
हासरी आहेस तू सुद्धा
अर्थ नक्की काय हसण्याचा
अर्थ नक्की काय हसण्याचा
सर्व सोंगे घेउनी झाली
काळ आला शांत बसण्याचा
काळ आला शांत बसण्याचा
वजन नात्यांचे कमी झाले
फायदा झालाच पळण्याचा
फायदा झालाच पळण्याचा
हा रडीचा डाव नाही हा
डाव आहे ..डाव देवाचा
डाव आहे ..डाव देवाचा
मी अश्या खेळात आहे जो
खेळ आहे फक्त बघण्याचा
खेळ आहे फक्त बघण्याचा
कावळे आले विचारांचे
पिंड नव्हता जग बदलण्याचा
पिंड नव्हता जग बदलण्याचा
फ्रेम आहे चांगली स्वप्निल
बदल चष्म्याच्या तुझ्या काचा
बदल चष्म्याच्या तुझ्या काचा
५.
आपले आहेत माझ्या भोवताली केवढे
सापळे आहेत माझ्या भोवताली केवढे
आपले आहेत माझ्या भोवताली केवढे
सापळे आहेत माझ्या भोवताली केवढे
चौकशी करतात माझी काळजी नसली तरी
मोकळे आहेत माझ्या भोवताली केवढे
मोकळे आहेत माझ्या भोवताली केवढे
विसरुनी जातील ते लक्षात ठेवावे असे
वेंधळे आहेत माझ्या भोवताली केवढे
वेंधळे आहेत माझ्या भोवताली केवढे
बघ अकारण वेगळा पडलोय मी गर्दीमधे
वेगळे आहेत माझ्या भोवताली केवढे
वेगळे आहेत माझ्या भोवताली केवढे
मी स्वतःचे ऐकण्याची सोय नाही राहिली
हे गळे आहेत माझ्या भोवताली केवढे
हे गळे आहेत माझ्या भोवताली केवढे
रोज एखाद्या गटाची चालली असते मजा
सोहळे आहेत माझ्या भोवताली केवढे
सोहळे आहेत माझ्या भोवताली केवढे
कोलुनी ह्यांना ..स्वतःला देव का मानू नये
सोवळे आहेत माझ्या भोवताली केवढे
सोवळे आहेत माझ्या भोवताली केवढे
केवढ्या कंड्या इथे पिकतात काही कल्पना?
हे मळे आहेत माझ्या भोवताली केवढे
हे मळे आहेत माझ्या भोवताली केवढे
वाढले साम्राज्य घाणीचे कदाचित त्यामुळे
कावळे आहेत माझ्या भोवताली केवढे
कावळे आहेत माझ्या भोवताली केवढे
केवढ्या आहेत स्वप्निल भोवताली शक्यता
आंधळे आहेत माझ्या भोवताली केवढे
आंधळे आहेत माझ्या भोवताली केवढे
-स्वप्निल शेवडे
No comments:
Post a Comment