गझल ही छंदबध्द रचना ! तिचे शब्द अंगभूत अशी लय घेऊन जन्माला येतात.एक उपजत अशी सांगितिकता या शब्दांना लाभलेली असते.
यापुढे जाऊन असं म्हणता येईल की संगीतातला प्रत्येक स्वर विविध प्रकारचे भाव व्यक्त करतो किंवा अनेक अभिव्यक्तींच्या छटा आणि शक्यता या स्वरामध्ये असतात.
नेमकी हीच क्षमता गझलच्या शब्दांमध्ये आढळते.म्हणूनच गझलचा विचार साहित्यिक आणि सांगितिक अशा दोन्ही द्रुष्टीकोनातून करणं जास्त सयुक्तिक ठरते.
मराठी गझलच्या संदर्भात विचार करताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे या गझलचा आशय आणि विषय आज विलक्षण व्यापक झालेला आहे .परंतु अजूनही मराठी भावसंगीताच्या दालनात मराठी गझल ला विशीष्ट स्थान मात्र प्राप्त झालेलं नाही.
यांचं एक प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सांगितिक विश्र्वाला लाभलेली नाट्यसंगीत आणि भावगीत यांची अत्यंत समृद्ध अशी परंपरा !
या गीतांच्या लोकप्रियतेची मोहिनी आजही मराठी रसिकांच्या मनावर कायम आहे.
मात्र गंमतीची गोष्ट अशी आहे की या परंपरेतील अनेक लोकप्रिय नाट्य गीतांच्या चाली गझल च्या प्रभावातून आलेल्या होत्या.आणि भावगीतांमध्ये तर गझल बेमालूमपणे मिसळून गेली होती.
मराठी भावसंगीतातल्या गझल च्या या प्रवासात अनेक कवी;गायक आणि संगीतकार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले दिसून येते.
नाट्यसंगीताच्या प्रदीर्घ परंपरेत अनेक प्रतिभावंत संगीतकार महाराष्ट्राला लाभले.या संगीत कारांनी नाट्यसंगीतात अनेक नवनवीन प्रयोग केले.
यातूनच इ.स.१८९६ मध्ये पाटणकर संगीत मंडळींनी पारशी रंगभूमीवर च्या उर्दू गझल आणि कव्वाली च्या चालींवरून प्रेरणा घेऊन त्या स्वरुपाच्या चाली नाट्य गीतांना दिल्या होत्या.
तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी वीरतनय (१८९६) त्याचप्रमाणे मूकनायक (१९०१) या नाटकांसाठी गझल आणि कव्वाली च्या चाली वापरल्या.
जलद लय ;स्वरांची अनपेक्षित वळणे यामुळे या चाली खूप लोकप्रिय झाल्या.
"एकच प्याला " या नाटकातील "सत्यवदे वचनाला नाथा "या सारखी ठुमरी शैली ची गाणी त्या काळी तरी खूप गाजली, आजही नाट्य संगीताच्या मैफलीत या गाण्याची आठवण हमखास होते.
नाट्य संगीता प्रमाणे मराठी भावसंगीतात गझल सारखी किती तरी गाणी या काळात लोकप्रिय झाली होती.
एकच प्याला च्या गाण्यांच्या चालीसाठी सुंदराबाई जाधवांनी उत्तमोत्तम ठुमरी आणि दादरे यांचा वापर केला.
यांचं कारण हेच होतं की गझल च्या काव्य शैली ने कवींना तर गझल च्या गायकी ने संगीतकारांना विलक्षण भुरळ घातली होती.
सुरेश भट यांच्या आधी माधव ज्युलियन यांनी शास्त्र शुध्द गझल लिहिली पण त्यात गझलिअत नव्हती.पण याचा अर्थ असा नाही की मराठी साहित्यात याव्यतिरिक्त गझल लिहिण्याचा प्रयत्न झालाच नव्हता.अनेक कवींना गझलने मोहिनी घातली होती.त्यामुळे त्यांनी गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता.
शेरोशायरी चा भाव मराठी भाषेत आणणारी राजा बढे यांची ही रचना बघा.
"प्रेम केले .. काय हा झाला गुन्हा ?
अंतरीची भावना ..सांगू कुणा .."
तर शांता शेळके यांनी लिहिलेल्या आणि माणिक वर्मा यांनी गायलेल्या या गाण्याची नजाकत काही औरच..
" चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा..
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा.."
माणिक वर्मा यांच्या आवाजातल्या ठुमरी शैली च्या एका गीतातून जुन्या हिंदी चित्रपटात ल्या गझलची आठवण होते.
"त्या चित्त चोरट्याला का आपुले म्हणू मी..
स्मृतिजाल आसवांचे दिनरात का विणू मी..
खमाज रागातली ही लडिवाळ चाल
सहजतेने
"वो ना आयेंगे पलटकर..
उन्हे लाख हम बुलाए....
मेरी हसरतोंसे कहदो
के यह ख्वाब भूल जाए...
या शब्दांकडे घेऊन जाते.
शोभा गुर्टु यांनी देखील त्यांच्या अद्वितीय अशा ठुमरी शैली ने काही अजरामर गाणी गायली आणि मराठी गझल ला देखणे वळण दिले.
"उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या." "प्रीत कळेना माझिया प्रियाला " ही त्यांची गाणी गाजली.
सुरेश भट यांच्या कारकिर्दीपासून मात्र मराठी गझल चा प्रवास खर्या अर्थाने योग्य दिशेने सुरू झाला.
मलमली तारूण्य माझे..
तरूण आहे रात्र अजुनी..
मालवून टाक दीप..
यासारख्या तरल शब्दांनी.. रसिकांना मंत्रमुग्ध केले.लता दीदींच्या स्वर्गीय आवाजाने आणि
हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने या गझल अजरामर झाल्या.
मराठी गझलला पुढील काळात भीमराव पांचाळे; सुधाकर कदम या कलावंतांनी एक नवीन वळण देऊन ही गझल अनेक रसिकांपर्यंत पोचवली.
अनेक कवींना आज गझल आकर्षित करते आहे.रसिकांची संख्या ही वाढते आहे.मराठी गझल चे मुशायरे मोठ्या प्रमाणावर होतांना दिसतात.मराठी गझल च्या मैफिलीं ही लवकर च रंगतील अशी आशा करू या !!

डॉ. संगीता म्हसकर.
"दास्तान - ए - ग़ज़ल " या आगामी पुस्तकातील काही भाग.
No comments:
Post a Comment