संकटांचा बांध करते माय माझी
त्यावरी संसार कसते माय माझी
त्यावरी संसार कसते माय माझी
पेलण्या अंधार थकल्या झोपडीचा
रात्रभर चिंतेत जळते माय माझी
रात्रभर चिंतेत जळते माय माझी
वाढदिवशी लेकरांना खूश करण्या
भाकरीचा केक करते माय माझी
भाकरीचा केक करते माय माझी
जाहल्या चिंध्या किती या जीवनाच्या
फाटके आयुष्य शिवते माय माझी
फाटके आयुष्य शिवते माय माझी
बाप माझा खूप रडतो पाहिल्यावर
एवढया दुःखात हसते माय माझी
एवढया दुःखात हसते माय माझी
या जगाचे पोट भरले वावराने
वावराचे पोट भरते माय माझी
वावराचे पोट भरते माय माझी
२.
दूर केलेस तू कित्येक काळजांना
जिंदगी संपते माणूस जोडतांना
जिंदगी संपते माणूस जोडतांना
आठवा आपल्या लेकीस श्वापदांनो
अंगणी आपल्या सूनेस जाळतांना
अंगणी आपल्या सूनेस जाळतांना
नेहमी पाहतो शेतात मी बळीला
घास तोंडातला मातीत पेरतांना
घास तोंडातला मातीत पेरतांना
काय पक्ष्यास झाले चिव-चिवाट नाही
का शिकवता तुम्ही ही जात पाखरांना
का शिकवता तुम्ही ही जात पाखरांना
दोन तोंडी असे ही जात माणसांची
व्यर्थ करता किती बदनाम गांडुळांना
व्यर्थ करता किती बदनाम गांडुळांना
-अविनाश विनायक येलकर
No comments:
Post a Comment