पूजकांनी पापपुण्याची दुकाने मांडली
याचसाठी ईश्वरा मी मंदिरेही टाळली
याचसाठी ईश्वरा मी मंदिरेही टाळली
पेटवा अंधार आणिक नेमके लावा दिवे
तेज ज्या म्हणतात त्याला कीड आहे लागली
तेज ज्या म्हणतात त्याला कीड आहे लागली
काल गेला त्याच मार्गे आजही जाईल बघ
काळजी घे की उद्याची वेळ यावी चांगली
काळजी घे की उद्याची वेळ यावी चांगली
काय समजावी तयांना याचकाची वेदना
वेदनेवाचून ज्यांची भूक आहे भागली
वेदनेवाचून ज्यांची भूक आहे भागली
तो तुझा कुठला ऋतू शोकांतिकांना जाळतो
आणि देतो भर उन्हाला छानपैकी सावली ?
आणि देतो भर उन्हाला छानपैकी सावली ?
राग "श्रीमंती"च केवळ गायिला गेला जिथे
सूर कुठला काळजाचा फक्त नाणी वाजली.. !!
सूर कुठला काळजाचा फक्त नाणी वाजली.. !!
२.
आपलेसे करून चोरांना
देश टाका विकून चोरांना
देश टाका विकून चोरांना
मी न चुकवेन एकही हप्ता
सवलती द्या म्हणून चोरांना
सवलती द्या म्हणून चोरांना
दोष माळू परस्परांवरती
साथ देऊ हसून चोरांना
साथ देऊ हसून चोरांना
सज्जनांना सजा कशाचीही
अन व्यवस्था भिऊन चोरांना
अन व्यवस्था भिऊन चोरांना
मूर्ख आहेच येथली जनता
बांधु बघते अजून चोरांना
बांधु बघते अजून चोरांना
फंड पक्षास पाहिजे ... तेंव्हा
नीट ठेवा जपून चोरांना
नीट ठेवा जपून चोरांना
कायद्या ही तुझ्यावरी शंका
का न उरला पुरून चोरांना ?
- विश्वास कुलकर्णी
का न उरला पुरून चोरांना ?
- विश्वास कुलकर्णी
No comments:
Post a Comment