Showing posts with label विजयकुमार देशपांडे. Show all posts
Showing posts with label विजयकुमार देशपांडे. Show all posts

विजयकुमार देशपांडे : दोन गझला



१.

प्रेम तुझ्यावर बहुधा माझे जडते आहे
बघता मी तुज नजर तुझी का झुकते आहे..
.
न जरी हल्ली ती मज कोठे दिसते आहे 
आठवणीच्या उदद्यानी मन रमते आहे..
.
प्रेम तिच्यावर बागेमध्ये करतो मीही
नजर उगा का बघणाऱ्यांची जळते आहेे..
.
काळ किती ते नाही कळले बसलो आपण
स्पर्शामधुनी संवादाला भरते आहे..
.
लपव खळी ती येताना तू गालावरची
ना बोलाया सुचते मग मन रुसते आहे..

.
२.

स्वप्न मला का असेच पडते
अवतीभवती ती घुटमळते ..

स्वप्नी म्हणते नक्की भेटू
जागे होता का मग पळते ..

स्वप्नामधली रात्र सुखाची
दिवसाची मग वाट लागते ..

समोर ना ती कधीच येते 
सखी वेड का मना लावते ..

सहन न होते कुणास सांगू
दु:ख मनीचे मनास छळते ..
.