(श्री विवेक काणे ह्यांच्या "कठपूतळी" संग्रहाच्या प्रस्तावनेतील काही गद्यखंडांचा अनुवाद. मराठी वाचकांच्या अनुकूलतेसाठी त्यातल्या गुजराती उदाहरणां ऐवजी उर्दु उदाहरणे घेतली आहेत.)
चित्रकार Vincent Van Gogh ने रंगविलेल्या आकाशात स्पष्ट दिसून येणारे Brush Strokes किंवा किशोरी अमोणकरांच्या खयाल गायकी मधम्या विशिष्ट हरकती, किंवा पंडित सुरेश तळवलकर यांच्या तबलावादनातली एखाद्या कायद्याची लाक्षणिक लयकारी, किंवा ज्योत्स्ना भट्ट यांनी चाकावर तयार केलेल्या मातीच्या घड्यांवर मुद्दाम राहू दिलेले हाथाचे ठसे(Hand-Marks), ह्या सर्वांमागे काही समान उद्देश आहे का? वैयक्तिकता (Individuality) हे कोणत्याही कलाकृतीचे मुख्य लक्षण होय. कलाकृती आणी यंत्राने उत्पादित वस्तु मधे हाच तर मुख्य भेद आहे.
'राग मारवा, उस्ताद अमीर खां सारखा कुणी गायलेला नाही' किंवा 'कुण्या एका गझलकाराने अमुक छंद खूप उत्तम रीत्या वापरला आहे' - असे विधान आपल्याला ऐकायला मिळतात. ह्यांचा काही शास्त्रीय आधार आहे का? गझलेत वैयक्तिकता अनेक पद्धतीने येऊ शकते - रवानी म्हणजेच प्रवाहिता, विचार मांडायची लाक्षणिक पद्धत, शब्द-विवेक, भाषाकर्म वगेरे. परंतु मला इथे जे सांगायचे आहे ते आहे गझलच्या छंदांच्या उत्तम प्रयोजनाविषयी.दोन गझलकार, एकाच छंदात दोन स्वतंत्र गझल लिहितात, त्या दोन्ही गझला, सुटींच्या सर्वसाधारणपणे स्वीकृत नियमां प्रमाणे १००% छंदात आणि एकाच छंदात असून ही घेतलेल्या सुटींचे प्रकार, त्यांचे प्रमाण व आकृतीबंध या दृष्टीने त्या दोन्ही गझला वेगळ्या असतात. इथेच वैयक्तिकतेला वाव मिळतो, आणि दोन गझलकारांनी तो छंद वेगवेगळ्या पद्धतीने वापरला असं आपण म्हणू शकतो.हा मुद्दा जास्त स्पष्ट करायला काही उदाहरणे पाहूया.
छंद- गागाल लगागाल लगागाल लगागा
हा छंद विशिष्ट एवढ्यासाठी आहे की त्या मध्ये तीन वेळा दोन लघु मात्रा एकत्र येतात, व त्या दोन लघु म्हणूनच जपायला लागतात (त्यांना एकत्र करून एक गुरु करता येत नाही), अन्यथा तो छंददोष होतो.
दुनिया(में) हम आये (हैं) (तो) जीना (ही) पडेगा
जीवन (है) अगर जहर, (तो) पीना (ही) पडेगा
जीवन (है) अगर जहर, (तो) पीना (ही) पडेगा
उनको (ये) शिकायत (है) कि हम कुछ न(हीं) "कहे"ते
अपनी (तो) (ये) आदत (है) कि हम कुछ न(हीं) "कहे"ते
अपनी (तो) (ये) आदत (है) कि हम कुछ न(हीं) "कहे"ते
सीने (में) जलन आँख (में) तूफान (सा) क्यूँ है
इस शहर (में) हर शख़्स परेशान (सा) क्यूँ है
इस शहर (में) हर शख़्स परेशान (सा) क्यूँ है
दुनिया(में) (हूँ) दुनिया (का) तलबगार न(हीं) हूँ
बाज़ार (से) गुज़रा (हूँ), ख़रीददार न(हीं) हूँ
बाज़ार (से) गुज़रा (हूँ), ख़रीददार न(हीं) हूँ
रंजिश (ही) सही दिल (ही) दुखाने (के) लिये आ
आ फिर (से) मुझे छोड़ (के) जाने (के) लिये आ
आ फिर (से) मुझे छोड़ (के) जाने (के) लिये आ
या शेरांच्या संदर्भात या छंदात उत्तम काम करणे म्हणजे काय, आणि उत्तम कामाची प्रमुख लक्षणे काय आहेत ते पाहूया :
१) कंसात लिहिलेल्या अक्षरांचे उच्चार, प्रथमदृष्ट्या काना/मात्रा/वेलांटी पाहता गुरू वाटत असले तरी लघु म्हणून उपयोजिलेले आहेत. परंतु, ह्या सर्व जागेंवर लघु उच्चार केल्याने शब्दाच्या सौंदर्याचा ऱ्हास होत नाही, किंवा छंदाच्या पठनात विक्षेप येत नाही. शब्दांती येणाऱ्या किंवा सुट्या एकाक्षरी गुरूचा लघु उच्चार केल्यास कानाला तो फारसा खटकत नाही.
२) अवतरण चिन्हात लिहिलेले उच्चार, एका गुरूपेक्षा मोठे असे उच्चार एक गुरु म्हणून वापरलेले आहेत. इथे सुद्धा शब्दाच्या सौंदर्यास धक्का पोहोचत नाही व लयीत पण व्यत्यय येत नाही.
३) १ व २ मधे दाखविल्या प्रमाणे छंदात घेतल्या गेलेल्या या सर्व सुटी विवेकपूर्ण आहेत. संख्येच्या दृष्टीने पाहिले तर या सुटी एका पंक्तित तीन किंवा चार पेक्षा जास्त नाहीत.
४) सर्व सुटी एकमेकांपासून अंतर ठेवून घेतलेल्या आहेत. एका पाठोपाठ येणाऱ्या सुटी दोनहून अधिक नाहीत. त्याने पंक्तिचे संतुलन सांभाळले जाते.
५) छंदात जिथे दोन लघु मात्रा एकत्र येतात तिथे बहुतेक ठिकाणी दोन पैकी एक (किंवा काही ठिकाणी दोन्ही) लघु सूट घेतलेला गुरु आहे. याने त्या ठिकाणी उच्चार दोन स्वतंत्र लघु म्हणूनच करावे असे प्रस्थापित होते आणि छंदाचे सौंदर्य बहरते.
६) जिथे दोन्ही लघु शुद्ध आहेत (म्हणजे त्या पैकी एक ही सूट घेऊन लघु केलेला गुरू नाही) तिथे पहिला लघु शब्दांती येतो आणी दुसऱ्या लघुने नवा शब्द सुरु होतो. या दोन लघुंमधे सहजतेने विराम घेता येतो व त्यांना एकत्र करून एक गुरू उच्चार करणे कठीण होते. ही व्यवस्था संस्कृत वृतांमधल्या "यति"च्या व्यवस्थे सारखी आहे. अश्या पद्धतीने इथे पण दोन स्वतंत्र लघु उच्चार अक्षत राहतात आणि छंदाचे सौंदर्य जपले जाते.
गझलच्या छंदात घेण्यात येणाऱ्या सुटींचे प्रकार, त्यांचे प्रमाण आणि त्यांचा आकृतीबंध गझलकाराच्या वैयक्तिकतेला वाव देतात व त्यातून त्याचा कला-विवेक उठून दिसतो.
No comments:
Post a Comment